Skip to main content

Posts

Showing posts from November, 2018

पालघर जिल्हयातील शिक्षक उपस्थित राहणार मुंबईतील शिक्षणाच्या वारीत

  मुंबईतील शिक्षणाच्या वारीत पालघर जिल्हयातील शिक्षक व पालक राहणार उपस्थित  प्रमोद पाटील  केळवे वार्ताहर ता.28  मुंबईतील वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर बुधवार (28) पासून सुरू झालेल्या शिक्षणाच्या वारीत पालघर जिल्हयातील सुमारे 125 शिक्षक आणि 125 शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य येत्या शुक्रवारी (ता. 30) उपस्थित राहणार आहेत.              विद्यार्थ्यांच्या विकासात शिक्षक-पालक दोघांचीही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शाळा व्यवस्थापन समिती ही मुख्यत्वेकरून पालकांचे प्रतिनिधित्व करते. शाळा व्यवस्थापन समिती हा घटक सक्षम झाल्यास शाळा विकासात लोकसमुदायाचा सहभाग अधिक वाढेल. त्यातून शिक्षक-पालक सुसंवाद निर्माण होईल आणि  100 % विद्यार्थी प्रगत करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. या उद्देशाने गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समित्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी यावर्षीची ‘शिक्षणाची वारी’ मुंबई येथे आयोजित केली आहे.        ‘शिक्षणाची वारी’चे यंदाचे चौथे वर्ष आहे. आतापर्यंत आयोजित केलेल्या शिक्षणाच्या वारीमध्ये सुमारे लाखभ...

कुणबी प्रिमीयर लीग चे शानदार उदघाटन

ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळणे आवश्यक- कोकण विभाग पाटबंधारे विकास उपाध्यक्ष जगदीश धोडी, चहाडे क्रीडा संकुलात तीसरया लीगचे शानदार उदघाटन  प्रमोद पाटील  केळवे वार्ताहर ता. 21         ग्रामीण भागातील खेळाडूंकडे प्रचंड इच्छाशक्ती आणि जबरदस्त काटकपणा असून त्यांना योग्य वेळी योग्य संधी उपलब्ध झाली तर ते त्या संधीचे सोने करतात. सुदैवाने आजही ग्रामीण भागात मोकळी मैदाने उपलब्ध आहेत हे त्यांचे भाग्य आहे असे प्रतिपादन कोकण विभाग पाटबंधारे विकास विभागाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी केले.            पालघर  कुणबी कला- क्रीडा प्रतिष्ठान आयोजित  कुणबी प्रिमीयर लीगचे आयोजन चहाडे क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. या लीगचा उदघाटन समारंभ बुधवारी (ता.21 मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या धोडी यांनी शासनाच्या विविध योजनांमध्ये मैदाने विकास करण्यासाठीफंड उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात वेगवेगळ्या क्रीडा प्रकारच्या स्पर्धा आयोजीत करून या खेळाडूंना संधी मिळेल देणे आवश्यक आहे असे सांगितले.  ...

कुणबी प्रिमीयर लीगला शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांची भेट

प्रमोद पाटील  केळवे वार्ताहर ता. 24  ग्रामीण भागात क्रिकेट सारख्या महागड्या खेळाचे सुंदर  आयोजन करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते हे अत्यंत कौतुकास्पद आहे असे प्रति...

कुणबी प्रिमीयर लीगला शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांची भेट

प्रमोद पाटील  केळवे वार्ताहर ता. 24  ग्रामीण भागात क्रिकेट सारख्या महागड्या खेळाचे सुंदर  आयोजन करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते हे अत्यंत कौतुकास्पद आहे असे प्रति...

मातृभाषा डोळे तर इंग्रजी भाषा चष्मा ; शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे

प्रमोद पाटील   केळवे वार्ताहर ता. 24       भारतात सुरू असलेली लाॅर्ड मॅकेलियो शिक्षण पद्धती कालबाह्य झाली असून ती मोडीत काढून शिवाजी महाराजांचा आदर्श असलेला अभ्यासक्रम ...

आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांने शिक्षकांना मिळणार दुय्यम सेवा पुस्तिका

रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना दिलासा मिळणार आमदार निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याने विविध निर्णय प्रमोद पाटील केळवे वार्ताहर ता. 18 : रायगड जिल्ह्यातील शिक्ष...

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड निरंजन डावखरे यांचा पालघर दौरा शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अॅड. निरंजन डावखरे

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड निरंजन डावखरे यांचा पालघर दौरा शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार  अॅड.  निरंजन डावखरे (प्रमोद पाट...