प्रमोद पाटील
केळवे वार्ताहर ता. 24
ग्रामीण भागात क्रिकेट सारख्या महागड्या खेळाचे सुंदर आयोजन करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते हे अत्यंत कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केले.
चहाडे क्रीडा संकुलात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पालघर कुणबी कला- क्रीडा प्रतिष्ठान आयोजित कुणबी प्रिमीयर लीगला शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी (ता. 24) भेट दिली. यावेळी तावडे यांनी खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून खेळामुळे परिपूर्ण माणूस घडतो असे सांगून या लीगला शुभेच्छा दिल्या.
या वेळी तावडे यांच्या हस्ते स्मृती चिन्हाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी तावडे यांनी फलंदाजी केली तर पालघर जिल्हयाचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी त्यांना गोलंदाजी करून हम भी कुछ कम नही असे दाखवून दिले. या लीगच्या सामन्याची नाणेफेक तावडे यांच्या हस्ते करण्यात आली.
या वेळी प्रमुख पाहुणे पालघर जिल्हयाचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सामाजिक कार्यकर्ते प्रविण राऊत, बाबजी काठोळे, चंदुलाल घरत, पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले, पालघरचे तहसीलदार महेश सागर, भाजपा पालघर जिल्हा उपाध्यक्ष सुजित पाटील, समिर पाटील, लीगचे अध्यक्ष करविंद पाटील, सचिव सुनिल जाधव, विश्वस्त भावेश पावडे व पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
छाया- प्रमोद पाटील
चहाडे येथील क्रीडा संकुलात फलंदाजी करताना क्रीडा मंत्री विनोद तावडे
Comments
Post a Comment