Skip to main content

Posts

Showing posts from May, 2022

समाज वर्तनाचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम...

 समाज वर्तनाचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम...          विद्यार्थ्यांच्या अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक  घटनेचा विद्यार्थ्यांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. अर्थातच समाज वर्तनाचा विद्यार्थ्यांवर खोलवर असा परिणाम आपल्याला दिसून येतो.        यासाठी प्रथम आपल्याला वर्तन म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक वाटते. खरंतर, वर्तन ही संकल्पना मानसशास्त्रा मधून समाजशास्त्रा मध्ये आली आहे. वर्तन म्हणजेच माणसाची वर्तणूक. एखाद्या प्रसंगी माणूस जी क्रिया किंवा कृती करतो अर्थातच वर्तणूक करतो त्यालाच आपण त्याचे "वर्तन" असे म्हणतो.  तर भावनिक प्रतिक्रिया जसे हसणे- रडणे हा देखील वर्तनाचा एक भाग म्हणता येईल.     मानसशास्त्रात वर्तन म्हणजे काय? तर वर्तन म्हणजे वर्तणूक किंवा वागणूक ही एक सामान्य संज्ञा आहे. जी क्रिया, क्रियाकलाप, प्रतिक्रिया, हालचाली, प्रक्रिया, ऑपरेशन्स इत्यादींचा समावेश करते. थोडक्यात, आपल्याला शरीराची कोणतीही मोजण्यायोग्य प्रतिक्रिया कसं म्हणता येईल . मानसशास्त्रात, कोणत्याही उत्तेजनामुळे उद्भवलेल्या ...

माझी आई...'जिजाऊ' संस्कारांची!

माझी आई...'जिजाऊ' संस्कारांची!        पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या निलेश भगवान सांबरे हे जिजाऊ शैक्षणिक व  सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. रस्ते बांधणी उद्योगातून मिळणाऱ्या नफ्याचा मोठा भाग ते 'स्वकमाईतून समाजसेवा' या सिद्धांतानुसार जिजाऊच्या सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करतात. कोकणात जिजाऊ च्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू आहेत. त्यांच्याबद्दल थोडसं...       पाड्यावर गेलो होतो. एक वृद्ध महिला भेटली, "मला जे दिसतंय ना ते तुमच्या जिजाऊमुळे. तुझ्या लोकांनी माझं ऑपरेशन केलं. मला चष्माही तुम्हीच दिलात." एक नाही अनेक, अशी माणसं भेटतात. कृतज्ञता व्यक्त करतात. खरंतर मी काहीच करत नाही. करतात ते आईचे संस्कार. आईनं ते संस्कार शिवबांच्या गोष्टींमधून केले. आईनं ते संस्कार आपल्या वागण्यातून केले. आईनं माझ्यावर केलेले संस्कार हेच आज आपल्या 'जिजाऊ'चे विचार झाले आहेत.         आई न कळत्या वयातही सांगायची, अरे आपलं काहीच नसतं. आपल्याकडे जे आहे, ते सर्वांचंच. देत राहावं. आज 'जिजाऊ'च्य...

साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीया

साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीया  प्रमोद पाटील पालघर,      अक्षय्य तृतीया हा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो.  साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया एक मुहूर्त आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे.या दिवशी लक्ष्मी आणि श्रीहरी यांची पूजा केल्यास अक्षय फळ मिळते असे मानले जाते. विवाह, गृहप्रवेश यासारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.       वैशाख शुल्क पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवसी हा सण येतो. या वर्षी ३ मे २०२२ रोजी अक्षय्य तृतीया हा सण आहे. तृतीया तिथी मंगळवार, ३ मे २०२२ रोजी सकाळी ०५:१९ पासून सुरू होईल आणि ४ मे रोजी सकाळी ०७:३३ पर्यंत राहील. पौराणिक कथेनुसार या दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले. भगवान परशुरामाचा अवतारही याच दिवशी झाला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातात. या दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. विशेषत: या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेल...