बहुत जनांसी आधारू, निलेश सांबरे "सेवा देण्याची वृत्ती अंगी असावी लागते. तुम्ही जेव्हा इतरांचा विकास करण्यासाठी मदत करतात तेव्हा त्यांच्या जोडीने तुमचाही विकास होतो " असे डेव्हिड ग्रीन यांनी म्हटलं आहे. सेवा हा संस्कृत शब्द आहे. सेवेला त्यागाची जोड दिल्यास आपली सेवा अधिक परिपूर्ण होऊ शकते. आपला समाज, शहर किंवा देश यांची सेवा करून आपण आपल्या निस्वार्थीपणाचा परीघ आपल्या कुटुंबापलीकडे विस्तारू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे निलेश भगवान सांबरे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील झडपोली या छोट्याशा गावापासून आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात करणारे निलेश सांबरे आज कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये अगदी निस्पृहपणे सेवा करत आहेत. ज्या समाजामध्ये आपण जन्मलो आहोत त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने प्रेरित होऊन कोकणचा कॅलिफोर्निया निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आज संपूर्ण कोकणात शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार, मह...