समाजाची सेवा करण्याची हीच खरी संधी:, डॉ. दीपक चौधरी यांचे प्रतिपादन, लायन्स क्लब ऑफ सफाळे अध्यक्षपदी ॲड. तारानाथ वर्तक
समाजाची सेवा करण्याची हीच खरी संधी:, डॉ. दीपक चौधरी यांचे प्रतिपादन, लायन्स क्लब ऑफ सफाळे अध्यक्षपदी ॲड. तारानाथ वर्तक पालघर... कोरोनाच्या जागतिक आपत्तीमुळे सामान्य माणूस खचला असून या सामान्य माणसाला उभा करण्यासाठी लायन्स क्लब अहोरात्र झटत असून स्वतःची काळजी घेत समाजाची सेवा करण्याची हीच खरी संधी आहे असे भावनिक मत पास्ट डिस्टिक गव्हर्नर डॉक्टर दीपक चौधरी यांनी व्यक्त केले. सफाळे लायन्स क्लबच्या 2020-2021 वर्षासाठी पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ रविवारी (तारीख 26) ऑनलाइन पद्धतीने झाला. या पदग्रहण समारंभाचे प्रमुख अधिकारी म्हणून डॉ.चौधरी बोलत होते. राज्यावर कोसळलेल्या संकटामुळे सामान्य माणूस पुरा खचला आहे. या सामान्य माणसाला उभा करण्यासाठी लायन्स क्लब च्या माध्यमातून पन्नास लाखांचा प्रकल्प उभा करून मुंबईतील डबेवाल्यांना तसेच मावळ तालुक्यात चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची दखल घेऊन तेथील आपद्ग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत कार्य करण्यात आले. भविष्यातही लायन्स क्लब कोरो...