Skip to main content

Posts

Showing posts from August, 2021

आपली संस्कृती!

प्रमोद पाटील (पालघर) श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे.    बालकवींनी श्रावण महिन्याचे अत्यंत सुंदर वर्णन  आपल्या कवितेमध्ये केले आहे.     भारतीय संस्कृती मध्ये सण, उत्सव, वैकल्ये  यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव येत असतात. या महिन्यात  संपूर्ण वातावरण अगदी प्रसन्न, हिरवेगार व उत्साहदायी असते.उन्हातील पाऊस आणि पाऊसातील ऊन पाहिले की मन भरून जाते. श्रावण महिन्यामध्ये निसर्ग हिरवागार होऊन जातो. कधी अचानक पाऊस पडतो तर कधी अचानक ऊन पडते.श्रावण महिन्यात रिमझिम पडणाऱ्या पाऊसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतो. आकाशातून बरसणाऱ्या सरींमध्ये भिजून जावे असे अनेकांना वाटते. श्रावणातील अशा अल्हाददायक वातावरणामुळे झाडे, फुले, पिके अगदीच ताजेतवाने दिसतात. आकाशामध्ये अधून मधून रंगबेरंगी इंद्रधनुष्य पाहून तर मन अगदी प्रसन्न होऊन जाते.श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव येत असतात. भाविक मोठ्या उत्साहात हे सर्व सण साजरे करत असतात.          या श्रावण महिन्याच्य...