मातृभाषेतूनच प्रभावी शिक्षण: प्रमोद पाटील यांचे प्रतिपादन, दातीवरे येथे विज्ञान प्रदर्शनाचे शानदार आयोजन
पालघर- परदेशातही आपापल्या भाषेतील शिक्षणाला प्राधान्य दिले जात असून आपल्या देशात मात्र आपण इंग्रजी माध्यमाचा अति आग्रह धरून अतिरेक तर करत नाही ना ? असा सवाल उपस्थित करून मातृभाषेेेतूनच शिक्षण महत्वाचे आहे असेे प्रतिपादन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील यांनी केले आहे. दातिवरे शिक्षण संस्थेच्या दातिवरे इंग्लिश हायस्कूल मध्ये मंगळवारी (ता. 17) आयोजित विज्ञान,चित्र व हस्तकला तसेच ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या पाटील यांनी आपण नुकताच इंडोनेशिया येथील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेला उपस्थित राहून तेथील शैक्षणिक पध्दती आत्मसात केली असता परदेशातील शाळांमध्ये दिवसांतून तीन वेळा गायत्री मंत्र आजही म्हटला जातो , तेथील शाळांमध्ये आरोग्य केंद्र उपलब्ध आहेत असे सांगून विद्यार्थ्यांच्या मनातील वैज्ञानिक जिज्ञासा वाढीस लागावी, त्यांच्या मनात विज्ञानविषयक कुतूहल निर्माण व्हावे, शाळेत शिकवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वैज्ञानिक सं...