- प्रमोद भालचंद्र पाटील
- राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा
सहशिक्षक,अभिनव विद्यालय विराथन बुद्रुक
ता.जि.पालघर
( महाराष्ट्र राज्य)
मोबाईल नंबर- 9049052555
प्रति,
मा.जयवंत खोत
शिक्षणाधिकारी ( माध्यमिक)
जिल्हा परिषद, पालघर
विषय- इंडोनेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचा अहवाल स्विकारण्या बाबत.....
महोदय,
उपरोक्त विषयान्वये , राज्यातील उपक्रमशील शिक्षक व मुख्याध्यापक हे दिनांक 19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2019 या कालावधीत इंडोनेशिया येथील बाली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेला उपस्थित राहिले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत राज्यातील शिक्षक शैक्षणिक दृष्टया प्रगल्भ होण्यासाठी निरंतर अध्यायनाच्या प्रक्रियेत यावेत यासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे. यामध्ये ऑनलाईन कोर्स, विविध परिसंवाद, शिक्षणाची वारी, शिक्षण परिषदा, तज्ज्ञांच्या मुलाखती, प्रगत शाळांना भेटी, स्वयंअध्ययन , ज्ञानरचनावाद, डिजिटल शाळा, तंत्रस्नेही प्रशिक्षण आदी उपक्रमांचा समावेश होतो.
राज्यात विविध स्तरावरुन गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मागणी सातत्याने जोर धरत आहे.या दृष्टीने पुढील काही वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तेत भारताचे स्थान अव्वल निर्माण करण्याच्या उद्देशाने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील PISA प्रोग्राॅम फाॅर इंटरनॅशनल स्टूडंट असेसमेंट मधील चाचणी मध्ये सन 2021 मध्ये राज्यातील मुलांची सरासरी वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जात आहे. PISA निर्धारित जागतिक गुणवत्ता वाढविण्यासाठी परदेशातील शिक्षण प्रणाली समजून घेणे आवश्यक आहे.
राज्याचे तत्कालीन शिक्षण सचिव मा. नंदकुमार यांच्या संकल्पनेतून या पुर्वी सिंगापूर येथे झालेल्या शैक्षणिक परिषदेला राज्यातील शिक्षकांनी उपस्थिती दाखवली होती. याच धर्तीवर क्रासवे इंटरनॅशनल फोरम च्या माध्यमातून राज्यातील शिक्षक इंडोनेशिया येथील शैक्षणिक परिषदेत उपस्थित राहिले.
आपणास सदर शैक्षणिक परिषदेचा अहवाल सादर करत आहोत. त्याचा स्विकार व्हावा ही विनंती.
धन्यवाद!
आपला,
( स्वाक्षरी)
- प्रमोद भालचंद्र पाटील
सहशिक्षक
अभिनव विद्यालय विराथन बुद्रुक
ता.जि.पालघर ( महाराष्ट्र राज्य)
मोबाईल नंबर- 9049052555
✍ अहवाल
आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत प्रमोद पाटील यांचा विशेष सन्मान , राज्यातील 30 शिक्षकांचा सहभाग......
- श्री. प्रमोद भालचंद्र पाटील ( एम.ए.बी.एड)
अभिनव विद्यालय विराथन बुद्रुक
ता.जि.पालघर 401404.
( महाराष्ट्र राज्य)
जागतिक पर्यटनाचे केंद्र असलेल्या इंडोनेशिया देशातील बाली येथील कुता(बडुंग) एसएमपीएन या ठिकाणी संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक कॉन्फरन्स मध्ये पालघर जिल्ह्यातून एकमेव शिक्षक म्हणून उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली.
राज्यातील सुमारे 30 उपक्रमशील शिक्षक, मुख्याध्यापक व नृत्य कलाकार विद्यार्थ्यांनी इंडोनेशिया देशातील बाली येथे शुक्रवार दि.22 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊन आपल्याकडील शोधनिबंध व विविध कौशल्य सादर केले. यामध्ये पालघर जिल्हयातील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा विराथन येथील अभिनव विद्यालयातील इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री. प्रमोद भालचंद्र पाटील यांनी भारतीय संस्कृती आणि शैक्षणिक पद्धती या विषयावर उत्तम सादरीकरण करून जगात भारतीय संस्कृती किती महत्वाची आहे हे विशद करून भारतीय प्राचीन व आधुनिक शिक्षण पद्धती यांची एकमेकांशी असलेले संबंध स्पष्ट केले. तसेच भारतातील विद्यमान शिक्षण पद्धती बरोबरच कठपुतलींवर आधारित पारंपरिक संस्कृतीचे उत्तम सादरीकरण केले.याची दखल घेऊन इंडोनेशिया येथे झालेल्या काॅन्फरन्सला पीजीआरआय चे सचिव मा. आयवाॅनत्तर अध्याना, बाली माध्यमिक विभागाच्या प्रमुख इन्होनी पत्तीसिना
कुटा येथील एसएमपीएन वन च्या मुख्याध्यापिका मा. ट्री रिबुतवाती, प्रमुख पाहुणे मा. पीटू सुधीवाती आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पाटील उभयतांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या परिषदेत भारतातील कला संस्कृतीचे दर्शन डोंबिवलीतील नृत्यम संस्थेच्या संचालिका भरत नाट्यम विशारद स्वप्ना देशपांडे, इद़धनू आर्ट अॅकेडमीच्या किर्ती निर्गुण व सहकारी तर रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण येथील नृत्य मल्हार कथक अॅकेडमीच्या कथक नृत्याविशारद स्कंधा (आर्या) चितळे व चिपळूण तेथील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनींनी रामायण व इतर विविध कार्यक्रमांच्या अप्रतिम सादरीकरणाबरोबरच डोंबिवलीच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना गवरे यांनी परंपरागत कठपुतलीचा शो आणि शिक्षण तज्ञ मा. मारूती गोंधळी यांनी वेगवेगळे आवाज काढून उपस्थितांची वाहवा मिळवली.
राज्यातील शिक्षकांनी 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2019 या दरम्यान इंडोनेशियातील वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून इंडोनेशियामधील शैक्षणिक, अध्यापन पद्धती समजून घेतली. तसेच आपल्याकडील शैक्षणिक पद्धती आणि विचारांचे आदान प्रदान केले.
इंडोनेशिया मधील बाली हे बेट पर्यटनाच्या दृष्टीने सुप्रसिद्ध आहे. रामायणाची आणि महाभारताची पार्श्वभूमी व संस्कृती या बाली बेटाला आहे. त्याकाळातील संस्कृती आणि परंपरा आजही येथे जोपासली जात आहे. अनेक हिंदू मंदिरे या ठिकाणी असून तसेच बाली हे नाव रामायणा मुळे पडले आहे. बाली हा सुग्रीवाचा भाऊ आपण रामायणामध्ये ऐकलेले आहे.या रामायणाचे प्रयोग येथे सुरू असून हे प्रयोग सुद्धा आम्ही पाहिले.
या परिषदेला कोल्हापूर विभागाचे माजी शिक्षण उपसंचालक मा. मारूती गोंधळी, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सहसचिव मा. ज्ञानेश्वर म्हात्रे, क्रॉसवेचे इंटरनॅशनलचे संचालक मा. दिलिप ठाणेकर, सिनेकलाकार मा. स्वप्निल फडके, पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या संचालिका तथा लालोंडे येथील स्व. विद्या विनोद अधिकारी विद्यालयाच्या मा. प्रगती पाटील, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे माजी अध्यक्ष मा.चंद्रकांत पवार, सर्वश्री. रमेश जाधव, बाळासाहेब सोनजे, काशीनाथ भोईर, प्रकाश घोडके, लालचंद पाटील, स्नेहलता झेले आदी शिक्षक उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील माझ्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिक्षक आमदार मा. बाळाराम पाटील, आमदार मा.निरंजन डावखरे, पालघर जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे सभापती मा. दामोदर पाटील, मेघराज शिक्षण संस्थेचे कार्यवाह मा.चंदुलाल घरत, जिल्हयातील शिक्षक तसेच शिक्षणप्रेमी यांनी देखील अभिनंदन केले.
इंडोनेशिया येथील शैक्षणिक परिषदेत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी पुढीलप्रमाणे सादरीकरण केले.
1) प्रमोद पाटील (अभिनव विद्यालय विराथन,पालघर)- भारतीय संस्कृती आणि शैक्षणिक पद्धती.
2) उज्ज्वला जगताप( जिल्हा परिषद शाळा नायगाव, मावळ, पुणे) - कृतीयुक्त अध्यापन पध्दती
3) प्रधान कुलकर्णी ( ठाणे)- गणितीय गंमती जमती
4) अनिल माळी(माॅडर्न एज्युकेशन सोसायटी इंग्लिश स्कूल नाशिक)- भारतीय पक्षी संवर्धन
5) संजय जगताप (जिल्हा परिषद शाळा टाकवे, मावळ, पुणे)- आय एस ओ स्कूल संकल्पना
6) सलमा अंसारी (जिल्हा परिषद उर्दू शाळा महापोली,भिवंडी)- शालेय गुणवत्ता विकास
7)सुनिल आहेर( शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा नाशिक)- प्लास्टीक प्रदुषण
8) ज्योती तांबे (जिल्हा परिषद शाळा हवेली, पुणे) - आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचा वापर
9) चंदाराणी कुसेकर( जिल्हा परिषद शाळा आदिवली, अंबरनाथ, ठाणे)-ज्ञानरचनावाद
10) कल्पना गवरे (आर.व्ही.नेरूरकर हायस्कूल डोंबिवली )- कठपुतली शो
11) मनिषा हिवरे ( जिल्हा परिषद केंद्रशाळा कसारा)- साहित्यातून शिक्षण
हा देश साडेतीनशे वर्षे डच अधिपत्याखाली होता. मात्र दुसर्या महायुद्धानंतर इंडोनेशिया स्वतंत्र झाला.
जकार्ता ही देशाची राजधानी आहे. येथील मुख्य भाषा बहासा इंडोनेशिया आहे. हिच्याखेरीज बासा जावा, बासा बाली, बासा सुंडा, बासा मादुरा इत्यादी अनेक भाषा येथे आहेत. येथे कावी नावाची एक प्राचीन भाषा आहे. येथील प्रमुख साहित्यिक ग्रंथ याच भाषेत आहेत. कावी भाषेतील भिन्नेक तुंग्गल इक - विभिन्नतेत एकता - हे या देशाचे घोषवाक्य आहे.
इंडोनेशियामध्ये जगातली एक सर्वांत मोठी जैविक विविधता आहे. आसियान व जी-२० ह्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा इंडोनेशिया हा सदस्य देश आहे.
इंडोनेशिया येथील शिक्षण पद्धतीची वैशिष्टये -
इंडोनेशिया येथे औपचारिक आणि अनोपचारिक शिक्षण पद्धती आहे. येथील शाळा सरकारी व खाजगी अशा आहेत.खाजगी शाळांना National plus school असे म्हणतात. 84% शाळा या under the ministry of National Education मध्ये तर 16% under the ministry of Religions Affairs मध्ये येतात.
1) 7 ते 12 वर्षांपर्यंत शिक्षण मोफत आणि सक्तीचे.
2) दोन सत्र पध्दती- जुलै- डिसेंबर अखेर ;शैक्षणिक वर्ष -जानेवारी ते जुन
3) भाषेचे माध्यम- इंडोनेशियन, इंग्रजी
4) येथील शाळांमध्ये दिवसांतून तीन वेळा गायत्री मंत्र म्हटला जातो.
4) 40 मिनिटांची तासिका
5) अकरा विषय
6) बजेट मध्ये 6% टक्के खर्च शिक्षणावर केला जातो.
7) उच्च शिक्षणासाठी बरेच विद्यार्थी अमेरिकेच्या संयुक्त संस्थांने, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया,बेल्जियम, ब्रिटन, जर्मनी या सारख्या देशांत जातात.
Level/Grade Typical age
Preschool
Pre-school
playgroup
3-4
Kindergarten 4-6
Primary School
1st Grade 6–7
2nd Grade 7–8
3rd Grade 8–9
4th Grade 9–10
5th Grade 10–11
6th Grade 11–12
Middle School
7th Grade 12-13
8th Grade 13-14
9th Grade 14-15
High School
10th Grade 15–16
11th Grade 16–17
12th Grade 17–18
Post-secondary education
Tertiary education
(College or
University)
Ages vary (usually
17-21 or 18-22 for
four years)
Comments
Post a Comment