Skip to main content

Posts

Showing posts from September, 2017

पालघर तालुक्यातील शालेय कबड्डी स्पर्धा

पालघर तालुक्यातील शालेय कबड्डी स्पर्धा 

कला शिक्षक कृतीसत्र , पालघर

 कला शिक्षक कृतीसत्र , पालघर   शालेय जीवनात कला- क्रीडा शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून या शिक्षकांनी केलेल्या संस्कारांमुळे यशस्वी माणूस घडतो असे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांनी केले.         पालघर जिल्हा कलाध्यापक संघ आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने मंगळवारी  (ता. 26)जिल्ह्यातील कला शिक्षकांचे एका दिवसाचे कृतीसत्र पालघर येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी भवन मध्ये संपन्न झाले. या  कृतीसत्राच्या उदघाटन प्रसंगी खरपडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट कौशल्य आंणि जिद्द असून त्यांना दिशा देण्याचे काम शिक्षकच करू शकतो असे सांगून आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.        या वेळी पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी कला शिक्षकांना अतिरिक्त करू नये अशी भूमिका शासनाने घेतली असून कला आणि क्रीडा शिक्षकांच्या कमी केलेल्या तासिका पूर्ववत करण्याचे आश्वासन शालेय शिक्षण व क्रीडा मंत्र्यांनी दिले आहे असे सांगितले. तसेच जिल्ह्यातील विविध ...