गुरुकुल खरात कुटुंबिय सहाय्य निधीचे जालना येथे वितरण -------------------------- पालघर (प्रमोद पाटील ) ता.11 ऑक्टोबर 2016 आत्ताच्या आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगात समाजात माणुसकी हरवत चालली आहे अशी ओरड आपण नेहमीच ऐकत असतो. तसेच सोशल नेटवर्किंग मुळे नवीन पिढी बरबाद होत आहे अशी ही ओरड एका बाजूने सुरू असताना एका निराधार कुटुंबाला केवळ "गुरुकुल व्हाॅटसअप ग्रूप" च्या माध्यमातून सुमारे 55,555/_ रूपयांची रोख रक्कम देऊन समाजात माणूसकी अजूनही शिल्लक आहे हे दाखवून दिले आहे. मराठवाडयातील जालना जिल्ह्य़ातील जाफराबाद येथील समर्थ विद्यालयात विना अनुदानित शाळेत कार्यरत असलेल्या गजानन विठोबा खरात या शिक्षकाचा विना अनुदानित शाळांना अनुदान मिळावे या करिता औरंगाबाद येथे आंदोलन करित असतांना शुक्रवार दि.10 जुन 2016 रोजी अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. खरात यांच्या पश्चात त्यांची आई चंद्रकला विठोबा खरात (वय 56), पत्नी सुकेशनी (वय 24) व मुलगा यश(वय 3) असा परिवार असून गजानन खरात यांच्या पश्चात कमावणारी व्यक्ती कुटुंबात नसल्याने या कुटु...