Skip to main content

Posts

Showing posts from November, 2019

इंडोनेशिया येथील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कॉन्फरन्समध्ये राज्यातील शिक्षकांनी घडविले भारतीय शिक्षण व संस्कृतीचे दर्शन

 येथील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कॉन्फरन्समध्ये राज्यातील शिक्षकांनी घडविले भारतीय शिक्षण व संस्कृतीचे दर्शन     पालघर-       महाराष्ट्र राज्यातील सुमारे 30 उपक्रमशील शिक्षक, मुख्याध्यापक व नृत्य कलाकार विद्यार्थ्यांनी इंडोनेशिया देशातील बाली येथे शुक्रवारी (ता. 22) झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक कॉन्फरन्समध्ये आपले विविध कौशल्य दाखवून भारतीय तिरंगा इंडोनेशियामध्ये अभिमानाने फडकविला.      जागतिक पर्यटनाचे  केंद्र असलेल्या बाली येथील कुता(बडुंग) एसएमपीएन या ठिकाणी संपन्न झालेल्या या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक कॉन्फरन्स मध्ये राज्यातील शिक्षकांनी आपल्याकडील शोधनिबंध व विविध  कौशल्य सादर केले. यामध्ये पालघर जिल्हयातील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील यांनी भारतीय संस्कृती आणि शैक्षणिक पद्धती या विषयावर पाॅवर पाॅईंट प्रझेंटेशन करून जगात भारतीय संस्कृती किती महत्वाची आहे हे विशद करून भारतीय प्राचीन व आधुनिक  शिक्षण पद्धती यांची एकमेकांशी असलेले संबंध स्पष्ट केले...