प्रतिष्ठित न्यूयॅार्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या ओपनिंग फिल्ममध्ये जिओ स्टुडिओजच्या ‘गोदावरी’ची निवड
प्रतिष्ठित न्यूयॅार्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या ओपनिंग फिल्ममध्ये जिओ स्टुडिओजच्या ‘गोदावरी’ची निवड प्रमोद पाटील पालघर ता.२६ प्रतिष्ठित अशा न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल २०२२ (NYIFF) मध्ये जिओ स्टुडिओजच्या 'गोदावरी' या मराठी चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली आहे. या खास निमित्तानं 'गोदावरी' या चित्रपटाची सोशल मीडियाद्वारे औपचारिक घोषणाही करण्यात येत आहे. ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव असे प्रतिभाशाली कलाकार आहेत. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केलं आहे. 'गोदावरी'विषयी निखिल महाजन म्हणतात, ''न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'गोदावरी' या चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड झाल्याचा खूपच आनंद आहे. हा चित्रपट आम्ही खूप सकारात्मक हेतूनं बनवला आहे. महामारीच्या काळात केवळ सोळा दिवसांत या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. माझ्यावर आणि माझ्या कामावर विश्वास ठेवल्याबद्दल मी जि...