लॉकडाऊनचे 21 दिवस... - प्रमोद पाटील, पालघर गेल्या काही दिवसांपासून लॉक डाऊन, क्वोरंटाइन, आयसोलेशन, वर्क फ्रॉम होम, लर्न फ्रॉम होम, कोविद 19, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, मास्क, सेनिटायझर, सोशल डिस्टन्ससिंग, काॅन्ट्राक्ट ट्रेसिंग, कन्टेन्टमेंट झोन, बफर झोन, हॉटस्पॉट आदी दैनंदिन व्यवहारात तसे फारसे वापरात नसलेल्या शब्दांचा कानावर अगदीच दिवसभर भडिमार होत होता. यामुळे धर्म, जात, पात, श्रीमंत-गरीब हा भेदभाव बाजूला ठेवून सर्व "लोक माणुसकी हाच धर्म" या उद्देशानं एकमेकांकडे बघू लागले. अलीकडे मोठ- मोठ्या उद्योजक, राजकारण्यांपासून अगदीच सामान्य माणसा पर्यंत प्रत्येकाचे जीवन खुपच बीझी झालंय. प्रत्येकाला सकाळ पासून रात्री पर्यंत थोडीशी उसंत मिळाली तर नशीब. दिवसभर माणूस धावा-धाव करताना दिसतो. आपण एक शिक्षक. शाळा संपली की इतर सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात कसा वेळ जातो तेच कळेना. सकाळी पाच वाजता उ...