Skip to main content

Posts

अविरत कार्याचा सुवर्ण प्रवास आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, चिंतामण ठाकूर सर

​ “प्रामाणिकतेची ठेवली शिदोरी, कार्याचा घेतला आनंद गोड, शिक्षकांच्या प्रश्नांत धावले पुढे, सेवेला दिला आयुष्यभर ओघ ओघ!” शिक्षक संघटनेचे कार्य म्हणजे केवळ मागण्या मांडणे नव्हे; तर शिक्षकांच्या भावना, प्रशासनाचा दृष्टिकोन आणि शिक्षणव्यवस्थेची गरज यांच्यामध्ये संवेदनशील पूल बांधणे. ही नाजूक आणि जबाबदारीची भूमिका माननीय चिंतामण ठाकूर सरांनी अतिशय तळमळीने, संयमाने आणि प्रामाणिकतेने पार पाडली. “Leadership is not about titles or positions — it’s about impact, influence, and inspiration.” ही इंग्रजी ओळ जणू ठाकूर सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि कार्याचे प्रतिबिंबच आहे.पालघर–ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्य करताना त्यांनी संघटनेतील प्रत्येक सदस्याला स्वतःच्या कुटुंबाचा एक भाग मानले. शिक्षकांची एखादी अडचण आली की कार्यालयापर्यंत जाऊन ती सोडवण्याची तयारी हेच त्यांचे खरे परिचयपत्र ठरले.       मला त्यांच्यासोबत अनेक आंदोलनांत सहभागी होण्याचा, विविध सभा-संमेलनांना हजर राहण्याचा योग आला. त्या प्रत्येक क्षणी त्यांचा शांत स्वभाव, दूरदृष्टी आणि सतत जागृत लेखणी माझ्यासा...
Recent posts

पूर्व आशियातील मोती-व्हिएतनाम

-शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील             अरिकेतील शिकागो येथील व्यावसायिक मेल्विन जोन्स (Melvin Jones) यांनी ७ जून १९१७ रोजी लायन्स क्लब इंटरनॅशनल (Lions Clubs International) ची स्थापना केली. ही एक जागतिक स्वयंसेवी संस्था आहे, जी सामाजिक सेवेसाठी कार्य करते. या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे दृष्टिहीन आणि दुर्बल दृष्टी असलेल्यांसाठी सेवा करणे, तसेच शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, युवा, महिला विकास यांसारख्या क्षेत्रात कार्य करणे.     मेल्विन जोन्सच्या मते, "A man’s worth is not measured by what he gets, but by what he gives." (माणसाची किंमत त्याने काय मिळवले यावर नाही, तर काय दिले यावर मोजली जाते.)     त्यानुसार लायन्स क्लब तर्फे दृष्टी सेवा (SightFirst) नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्म्यांचे वाटप, दुर्घटनाग्रस्त व नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत, शाळा, वाचनालये, शिष्यवृत्त्या, युवक व किशोरवयीन मुलांसाठी नेतृत्व विकास, आरोग्य शिबिरे व रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीमा, अन्नधान्य वाटप आदी उपक्रम राबविले जातात.     ...

तरुणांचा दीपस्तंभ:, सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ ------ प्रमोद पाटील

      तरुणांचा दीपस्तंभ:, सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ        - प्रमोद पाटील          १९ मे १९६८ रोजी तत्कालीन समाजातील तरुणांनी एकत्र येऊन सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. मंडळाची स्थापना केली. आज या मंडळाचा ५६ वा वर्धापन दिन आहे. या वर्धापनदिनाच्या निमित्ताने प्रथमतः मंडळाच्या सर्व आदरणीय आद्य संस्थापकांना मानाचा मुजरा. तसेच सर्व आजी- माजी पदाधिकारी, विविध दाते, जाहिरातीदार आणि तमाम बंधू-भगिनींना वर्धापन दिनाच्या खूप- खूप शुभेच्छा !      एखादी संस्था अविरतपणे ५६ वर्ष जोमाने कार्य करत असते, तेव्हा अशा संस्थेचे कार्य हे निश्चितच नव्या पिढीला प्रेरणादायी, नवी दिशा देणारं असतं. एखाद्या दीपस्तंभासारखे असते. मंडळाची स्थापना करतांना मंडळाच्या आद्य संस्थापक आणि कार्यकर्त्यांनी पुढील काळाची अचूक पावले ओळखून अत्यंत दूरदृष्टीने विचार करूनच स्थापना केली. आज मंडळाच्या माध्यमातून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून समाजातील युवक-यवतींच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले जाते. शेतकरी दौ...

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

....आणि आकाश 'त्याला' भेटला!

....आणि आकाश 'त्याला' भेटला!  प्रमोद पाटील, पालघर ता.१८ अभिनेता आकाश ठोसरने अल्पावधीतच आपल्या चाहत्यांच्या मनात घर केले. त्याच्या 'परश्या' या भूमिकेची क्रेझ आजही इतक्या वर्षांनंतर चाहत्यांच्या मनात कायम आहे. आकाशची एक झलक पाहायला मिळावी, यासाठी तरुणींची आणि त्याच्या चाहत्यांची गर्दी उसळते. आकाश त्याच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र दौरा करत आहे. आकाश कोल्हापूरमध्ये आगामी चित्रपटाच्या निमित्ताने पत्रकार परिषद आणि कॉलेज प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त असताना त्याला एक वेगळा अनुभव आला. पत्रकार परिषद होईपर्यंत आकाशचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी, बोलण्यासाठी वाट बघत भर उन्हात थांबला होता. आकाश आपल्या चाहत्याला भर पत्रकार परिषदेच्या धावपळीतून वेळ काढून भेटला. त्याचबरोबर स्वतः नागराज मंजुळे देखील त्या चाहत्याच्या भेटीस जाऊन त्याच्याशी बोलले, त्याच्या सोबत फोटो आणि व्हिडिओ सुद्धा काढले. आकाशचा तो चाहता दिव्यांग होता. यावरून आकाशचे आपल्या चाहत्यांवरचे प्रेम आणि चाहत्याचे आकाशबद्दलचे प्रेम दिसून येते. आकाश ठोसरचा आगामी 'घर बंदूक बिरयानी' हा चित्...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

दिव्यांगांसोबत वाढदिवस...

    असा ही वाढदिवस...     वाढदिवस आणि केक या दोघांचं अलीकडे घट्ट नातं आहे. वाढदिवस म्हटला की तो केक शिवाय साजरा करणे म्हणजे अवघडच. मात्र या गोष्टीला  बगल देत दिव्यांगांसोबत वाढदिवस साजरा करतांना विशेष आनंद वाटला.       पालघर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या आमच्या वंदेमातरम अंध-अपंग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या सात-आठ वर्षांपासून आमचे विविध उपक्रम सुरू आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये या उपक्रमांमध्ये खंड पडला. दिव्यांगां मार्फत चालवत असलेली आमची खानावळ बंद झाली. आता अगरबत्ती, मेणबत्ती, पेपरडिश आदी बनवण्याचे काम थोड्याफार प्रमाणात सुरू आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून आमच्या गाठीभेटी फार कमी झाल्या. वंदे मातरम अंध-अपंग सेवाभावी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. विनोद राऊत सर नेहमी संपर्कात असतात. पण वेळेअभावी भेटता येणे शक्य होत नाही. गेल्या दोन दिवसांपूर्वी राऊत सरांचा फोन आला की सर आपण कधी भेटणार आहात? मी दोन दिवसांनी भेटू असे सहजच सांगितले. राऊत सर म्हणजे अत्यंत हुशार व्यक्ती. कोणत्याही गोष्टीचा पाठपु...