Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

लॉक डाऊन नंतरच्या शालेय शिक्षणात क्रीडा शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्त्व, आमदार कपिल पाटील

पालघर, प्रमोद पाटील       लॉकडाऊन नंतरच्या शालेय शिक्षणात शारीरिक शिक्षणाचे महत्व व शारीरिक शिक्षण शिक्षकाची भूमिका या संदर्भात महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाने सहयोगी शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनांच्या मदतीने राज्यातील सातही विभागाचे शिक्षक आमदार व पदवीधर आमदारांसोबत ऑनलाईन बैठकीचे रविवार (ता. 24 ) आयोजन करण्यात आले होते.         क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शिक्षक आमदारानी मार्गदर्शन करताना म्हटले की, बदलत्या तंत्रशिक्षणाच्या युगात व कोरोनानंतर विद्यार्थ्यांची शारीरिक सुदृढता महत्वाची असून शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढ करण्याचे काम क्रीडा शिक्षकांच्या माध्यमातून होणार असल्याचे मत कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी मांडले. कोरोनानंतर शाळा उघडल्यावर विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांची संख्या वाढवावी लागेल. याबाबतीत दोन दिवसांपूर्वीच शिक्षण मंत्री वर्षा...

पालघर जिल्ह्यातील कलारत्ने ... प्रमोद पाटील

"इथे प्रत्येकजण आपआपल्या घरात,          अन प्रत्येकाचं दार बंद आहे           तर काहीतरी रेखाटनं हा           कला शिक्षकांचा छंद आहे".        गेल्या मार्च महिन्यापासून देशात पर्यायाने महाराष्ट्र राज्यात लॉक डाऊन सुरू असल्याने शाळा बंद आहेत. सध्या जरी मे महिना असला तरी ही मे महिन्याची उन्हाळी सुट्टी न वाटता कोरोनाची सुट्टी वाटते. नुसत्या शाळाच बंद नाहीत तर जवळ जवळ सर्वच बंद असल्याने लॉक डाऊनमुळे घराबाहेर पडणे कठीण झालं आहे. अशा या कालावधीमध्ये आपण काय करावं? असा प्रश्न काहींच्या पुढे निर्माण झाला असला तरी पालघर जिल्ह्यातील कला शिक्षकांनी मात्र या संधीचं सोनं केलं आहे.          गत 58 दिवसांमध्ये पालघर जिल्ह्यातील ज्ञानेश्वर माळी, चित्रसेन पागधरे, भास्कर खेडकर, विनय पाटील, रुपेश वझे, रवींद्र बागे आदी कला शिक्षकांनी प्रथमतः कोरोना अर्थात covid-19 बाबत जनजागृती करण्यासाठी प्रशासन करत असलेल्या गोष्टी वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे अत्यंत मोला...

लॉक डाऊनच्या काळात पालघरच्या भगिनी समाज शाळेचा अभिनव उपक्रम

लॉक डाऊनच्या काळात पालघरच्या भगिनी समाज शाळेचा अभिनव उपक्रम  प्रमोद पाटील  पालघर        पालघर येथील भगिनी समाज संस्था संचलित, प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज या शाळेतील शिक्षक लॉक डाऊनच्या काळात 'वर्क फ्रॉम होम' करीत आहेत.शाळेतील उपक्रमशील शिक्षकांनी लॉक डाऊन च्या काळामध्ये विद्यार्थी आणि पालकांना अभ्यासासाठी प्रोत्साहित केले आहे.               या शाळेतील उपक्रमशील शिक्षक Testmoze.com या लिंकवरून प्रश्न निर्मिती करून ऑनलाइन चाचणी तयार करतात. तयार केलेल्या चाचणीची लिंक इयत्ता १ली ते ७ वी पर्यंतच्या वर्गानुसार पालकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर ती चाचणी प्रसारीत करतात. दिलेल्या लिंकवर टच केल्याबरोबर चाचणीचे पेज ओपन होते .त्यात विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव लिहून Start बटन दाबले की १० ते १५ प्रश्नांची चाचणी उपलब्ध होते .सदर चाचणीत वस्तुनिष्ठ प्रश्नावलीतील बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत .त्यातील अचूक उत्तर निवडून चाचणी सोडवल्यावर Submit बटन दाबल्यावर विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे व चुकलेली उत्तरे पहावयास मिळतात . विश...

तरुणांचा दीपस्तंभ... - प्रमोद पाटील

                तरुणांचा दीपस्तंभ ,   सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!           19 मे 1968 रोजी तत्कालीन समाजातील तरुणांनी एकत्र येऊन सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. मंडळाची स्थापना केली. आज या मंडळाचा 52 वा वर्धापन दिन आहे. या वर्धापनदिनाच्या निमित्ताने प्रथमतः मंडळाच्या सर्व आदरणीय आद्य संस्थापकांना मानाचा मुजरा. तसेच सर्व आजी- माजी पदाधिकारी, विविध दाते, जाहिरातीदार आणि तमाम बंधू-भगिनींना वर्धापन दिनाच्या खूप- खूप शुभेच्छा!      एखादी संस्था अविरतपणे 52 वर्ष जोमाने कार्य करत असते तेव्हा अशा संस्थेचे कार्य हे निश्चितच नव्या पिढीला प्रेरणादायी, नवी दिशा देणारं असतं. एखाद्या दीपस्तंभासारखे असते. मंडळाची स्थापना करताना मंडळाच्या आद्य संस्थापक आणि कार्यकर्त्यांनी पुढील काळाची पावले ओळखून अत्यंत दूरदृष्टीने विचार करूनच स्थापना केली. आज मंडळाच्या माध्यमातून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून समाजातील युवक-यवतींच्या कलागुणांन...

मातृभाषेतूनच सर्वोत्कृष्ट शिक्षण ; प्रमोद पाटील, मनोर येथील लालबहाद्दूर शास्त्री हायस्कूलमध्ये कार्यक्रम

 शिक्षणावर अपेक्षित खर्च आवश्यक ; प्रमोद पाटील  मनोर येथील लालबहाद्दूर शास्त्री हायस्कूलमध्ये कार्यक्रम   मनोर     आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जात असताना आपल्या देशात मात्र शिक्षणावर अपेक्षित  खर्च होत नाही. असा अभ्यासक्रम असायला हवा की शिक्षणातून खरा माणूस घडून त्याला योग्य व्यवसाय करण्यासाठी चालना मिळायला हवी असे परखड मत इंडोनेशिया येथील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत पालघर जिल्हयाचे नेतृत्व केलेल्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील यांनी मांडले आहे.        मनोर येथील जनरल एज्युकेशन सोसायटीच्या लालबहाद्दूर शास्त्री हायस्कूल व चाफेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा शुक्रवारी ( ता.14) वार्षिक पारितोषिक वितरण आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहाने पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रमोद पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना पाटील यांनी परदेशात आपल्या भाषेत शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध आहे. आपण मात्र इंग्रजी माध्यमाचा उगाचच अधिकच बाऊ करत असून मातृभाषेत...