Skip to main content

लॉक डाऊनच्या काळात पालघरच्या भगिनी समाज शाळेचा अभिनव उपक्रम


लॉक डाऊनच्या काळात पालघरच्या भगिनी समाज शाळेचा अभिनव उपक्रम
 प्रमोद पाटील
 पालघर 
      पालघर येथील भगिनी समाज संस्था संचलित, प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज या शाळेतील शिक्षक लॉक डाऊनच्या काळात 'वर्क फ्रॉम होम' करीत आहेत.शाळेतील उपक्रमशील शिक्षकांनी लॉक डाऊन च्या काळामध्ये विद्यार्थी आणि पालकांना अभ्यासासाठी प्रोत्साहित केले आहे.
              या शाळेतील उपक्रमशील शिक्षक Testmoze.com या लिंकवरून प्रश्न निर्मिती करून ऑनलाइन चाचणी तयार करतात. तयार केलेल्या चाचणीची लिंक इयत्ता १ली ते ७ वी पर्यंतच्या वर्गानुसार पालकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर ती चाचणी प्रसारीत करतात. दिलेल्या लिंकवर टच केल्याबरोबर चाचणीचे पेज ओपन होते .त्यात विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव लिहून Start बटन दाबले की १० ते १५ प्रश्नांची चाचणी उपलब्ध होते .सदर चाचणीत वस्तुनिष्ठ प्रश्नावलीतील बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत .त्यातील अचूक उत्तर निवडून चाचणी सोडवल्यावर Submit बटन दाबल्यावर विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे व चुकलेली उत्तरे पहावयास मिळतात . विशेष म्हणजे या चाचणीत दिलेल्या प्रश्नांमधील चुकलेल्या उत्तरांची बरोबर उत्तरे सुद्धा पहावयास मिळतात. तसेच चाचणीचा निकालही टक्केवारी मध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना ही ऑनलाईन चाचणी सोडवताना अत्यंत आनंद होत होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
                 भगिनी समाज शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिती वर्तक यांनी शाळेतील सर्व शिक्षकांना ऑनलाइन चाचणीबद्दल मार्गदर्शन केले . त्यामुळे शाळेतील उपक्रमशील शिक्षकांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित ,विज्ञान, इतिहास ,भूगोल व सामान्य-ज्ञान तसेच व्याकरणावर आधारीत मूलभूत क्षमताधिष्टित संकल्पनेवर घटकनिहाय प्रश्नांची चाचणी तयार करून प्रसारीत करतात. त्यामुळे या ऑनलाइन चाचणीला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
             प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज शाळेचे यंदाचे हे शैक्षणिक वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे . त्यामुळे या शैक्षणिक वर्षात शाळेमध्ये विविध उपक्रम साजरे करण्यात आले आहेत. त्यापैकी 'धागा शौर्याचा- राखी अभिमानाची', विकास घर संकल्पना, तालुकास्तरीय- वक्तृत्व स्पर्धा, काव्यगायन स्पर्धा, कथाकथन स्पर्धांचे आयोजन, रंगबिरंगी रिंग कवायत, विज्ञान प्रदर्शन आणि माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अशाप्रकारे विविध स्तुत्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आजघडीला भगिनी समाज शाळेने पालघर शहरातील मराठी माध्यमाची एक नामांकित अग्रगण्य शाळा म्हणून नावलौकिक मिळविलेला आहे. भगिनी समाज संस्था ही महिला मंडळामार्फत चालवली जाणारी संस्था आहे . या संस्थेचे बालमंदिर, प्राथमिक व माध्यमिक असे तीन विभाग असून यात पालघर पंचक्रोशीतील जवळपास १५०० विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या शाळेमध्ये ज्ञानरचनावादावर आधारीत तंत्रस्नेही व प्रयोगशील शिक्षकांच्या परिणामकारक अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून येण्यास मदत होत आहे. १९७० साली स्थापन झालेल्या प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज शाळेचे अनेक माजी विद्यार्थी समाजात अनेक मोठमोठ्या हुद्यावर कार्यरत आहेत .सध्या लॉक डाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राबवित असलेल्या 'ऑनलाइन चाचणी' सह अनेक अभिनव उपक्रमांबद्दल संस्थेचे पदाधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिती वर्तक तसेच सर्व उपक्रम उपक्रमशील शिक्षकांचे परिसरातून कौतुक होत आहे.

 प्रतिक्रिया :-

            "आमच्या शाळेचे शिक्षक हे नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबववित असतात. त्यांनी घेत असलेल्या मेहनतीमुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून येत आहे. म्हणूनच आमची शाळा सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत  प्रगतीपथावर चालत आहे."
        - माधुरी परूळेकर
     अध्यक्षा,भगिनी समाज संस्था

               "शिक्षकांना दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे चाचणी तयार करतात. पालकांच्या व्हाट्सअप ग्रुप वरून प्रसारीत करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत नाही. शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांचे आम्ही पालन करतो. आमची शाळा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत सुवर्ण महोत्सवी वर्षातून पदार्पण करीत आहे .याचा आम्हांला आनंद आहे."
       - प्रिती वर्तक
मुख्याध्यापिका, प्रा.वि.मं.भगिनी समाज.

                " लॉक डाऊन मध्ये शाळेने आँनलाइन चाचणी उपक्रम सुरु केल्याने आमच्या मुलांचे शिकणे हे चालूच आहे. व्हाट्सअपवर चाचणी सोडवताना मुलांना व आम्हांला देखील खुप आनंद होत आहे. त्यामुळे मी सर्व पालकांतर्फे शाळेचे आभार मानते ."
          - स्मिता पाटील.
     पालक प्रतिनिधी, इ.६ वी- अ

Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...