सफाळयातील विराथन बुद्रुक शाळेचे शतक; पालकांनी व्यक्त केलं शाळेविषयी प्रेम! प्रमोद पाटील केळवे वार्ताहर ता.13 ज्या शाळेत आपण शिकलो तेथे आता आपली मुलं, नातवंडे शिक्षण घेत आहेत.या शाळेने आता शतक गाठले. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे अशा भावना पालकांनी व्यक्त करीत शाळेविषयी आपली कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त केलं. या वेळी बरयाच जणांना आपल्या भावना आवरणेही कठीण झाले होते. सफाळे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या विराथन बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेचा शतक महोत्सवी सोहळा शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता.13) मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. 13 मार्च 1919 रोजी तत्काळीन परिसरातील परिस्थिती लक्षात घेऊन या जिल्हा परिषदेच्या शाळेची स्थापना करण्यात आली.विराथन, विठ्ठलवाडी, चिखलपाडा, जलसार आदी गावांतील विद्यार्थ्यांसाठी विराथन बुद्रुक येथे ही गटशाळा सुरू करण्यात आली.इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या शाळेत परिसरातील मोठ्या प्रमा...