अमरावती शारीरिक शिक्षण शिक्षक अधिवेशन पुढे ढकलले पालघर - येत्या 26 ते 28 मार्च या कालखंडात अमरावती येथे शारीरिक शिक्षण शिक्षकांचे अधिवेशन निश्चीत झाले होते. या अधिवेशनाला पालघर जिल्हयातील मोठ्या प्रमाणात शिक्षक उपस्थित राहणार होते. मात्र शासनाने कोरोना बाबत सावध पवित्रा घेत शासकीय कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, मेळावे, यात्रा , सार्वजनिक उपक्रम न घेण्याबाबत शासकीय कार्यालयांना आदेशीत केले आहे व इतर सामाजिक उपक्रमांबाबत निर्देश जारी करून दक्षता घेण्याचे केलेले आवाहनास प्रतिसाद देत अमरावती येथे होणारे अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय शारीरिक शिक्षण संघटनांच्या समन्वय समितीने घेतला असल्याची माहिती क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, अधिवेशन समन्वय समितीचे सदस्य प्रमोद पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती, शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अमरावती, क्रीडा शिक्षक महासंघ अनगर , क्रीडा विकास परिषद व सहयोगी संघटनांचे वतीने अधिवेशन निश्चीत करण्यात आले होते. सद्य स्थितीतील कोरोना विषाणुच्या संक्रमणाची तीव्रता लक...