Skip to main content

अमरावती येथे होणारे शारीरिक शिक्षण शिक्षकांचे अधिवेशन पुढे ढकळले

अमरावती शारीरिक शिक्षण शिक्षक अधिवेशन पुढे ढकलले

पालघर -
     येत्या 26 ते 28 मार्च या कालखंडात अमरावती येथे शारीरिक शिक्षण शिक्षकांचे अधिवेशन निश्चीत झाले होते. या अधिवेशनाला पालघर जिल्हयातील मोठ्या प्रमाणात शिक्षक उपस्थित राहणार होते. मात्र शासनाने कोरोना बाबत सावध पवित्रा घेत शासकीय कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, मेळावे, यात्रा , सार्वजनिक उपक्रम न घेण्याबाबत  शासकीय कार्यालयांना आदेशीत केले आहे व इतर सामाजिक उपक्रमांबाबत निर्देश जारी करून दक्षता घेण्याचे केलेले आवाहनास प्रतिसाद देत अमरावती येथे होणारे अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय शारीरिक शिक्षण संघटनांच्या समन्वय समितीने घेतला असल्याची माहिती क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, अधिवेशन समन्वय समितीचे सदस्य प्रमोद पाटील यांनी दिली.
      महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती, शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अमरावती, क्रीडा शिक्षक महासंघ अनगर , क्रीडा विकास परिषद व सहयोगी संघटनांचे वतीने अधिवेशन निश्चीत करण्यात आले होते. सद्य स्थितीतील कोरोना विषाणुच्या संक्रमणाची तीव्रता लक्षात घेता विषाणूचे संक्रमण होऊन धोका निर्माण होऊ नये म्हणून अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून पुढील तारीख समन्वय समितीच्या बैठकीत निश्चीत करणार असल्याचे अधिवेशनाचे निमंत्रक शिवदत्त ढवळे व समन्वय समिती अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे यांनी सांगितले.
       अधिवेशनासंदर्भात राज्य समन्वय समितीची तातडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस अमरावती महामंडळाचे अध्यक्ष डॉ अरुण खोडस्कर, सचिव डॉ पुरुषोत्तम उपर्वट, क्रीडा विकास परिषदेचे राज्य सचिव ज्ञानेश काळे, समन्वय समितीचे विश्वनाथ पाटोळे, राजेंद्र कोतकर, शिवदत्त ढवळे, संजय पाटील, शरद वाबळे, आनंद पवार, सुनील गागरे, जालिंदर आवारी, जितेंद्र लिंबकर या सह विविध जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...