-शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील अरिकेतील शिकागो येथील व्यावसायिक मेल्विन जोन्स (Melvin Jones) यांनी ७ जून १९१७ रोजी लायन्स क्लब इंटरनॅशनल (Lions Clubs International) ची स्थापना केली. ही एक जागतिक स्वयंसेवी संस्था आहे, जी सामाजिक सेवेसाठी कार्य करते. या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे दृष्टिहीन आणि दुर्बल दृष्टी असलेल्यांसाठी सेवा करणे, तसेच शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, युवा, महिला विकास यांसारख्या क्षेत्रात कार्य करणे. मेल्विन जोन्सच्या मते, "A man’s worth is not measured by what he gets, but by what he gives." (माणसाची किंमत त्याने काय मिळवले यावर नाही, तर काय दिले यावर मोजली जाते.) त्यानुसार लायन्स क्लब तर्फे दृष्टी सेवा (SightFirst) नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्म्यांचे वाटप, दुर्घटनाग्रस्त व नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत, शाळा, वाचनालये, शिष्यवृत्त्या, युवक व किशोरवयीन मुलांसाठी नेतृत्व विकास, आरोग्य शिबिरे व रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीमा, अन्नधान्य वाटप आदी उपक्रम राबविले जातात. ...