Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

पालघर जिल्हा कलाध्यापक संघाच्या अध्यक्षपदी रुपेश वझे

        पालघर जिल्हा कलाध्यापक संघाच्या अध्यक्षपदी वाणगाव येथील ज. म. ठाकुर विद्यालयाचे कलाशिक्षक रूपेश वझे यांची सोमवारी (ता.3) निवड झाली. ते पालघर- ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचयाचे आहेत.      महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या पालघर जिल्हा कलाध्यापक संघाची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर लगेच करण्यात आली. जिल्हा निर्मितीनंतर  लगेच ठाणे जिल्हा कलाध्यापक संघातून वेगळे होऊन प्रफुल्ल घरत यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने पालघर कलाध्यापक संघाची स्थापना झाली. घरत यांच्या सेवानिवृती नंतर गेल्या तीन वर्षापासून माहीम येथील भुवनेश किर्तनेे विद्यालयाचे कलाशिक्षक विनय पाटील यांनी संघाची यशस्वी धुरा सांभाळली. विनय पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदी संघाचे उपाध्यक्ष वझे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ते विविध शैक्षणिक संघटनांशी संबंधित असून  शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्याचं बालरक्षकचे अत्यंत महत्त्व...

दिव्यांगांचा आधारवड हरपला...

दिव्यांगांचा आधारवड हरपला...         पालघर टाइम्सचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, वंदे मातरम अंध-अपंग सेवाभावी संस्थेचे सल्लागार, आदिवासी मित्र पुरस्काराने सन्मानित, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.अशोक नाना चुरी यांचे वयाच्या 71 व्या वर्षी शुक्रवारी 7 ऑगस्ट रोजी सकाळी अकस्मात दुःखद निधन झाल्याची वार्ता समजली. ही दुःखद वार्ता एकताच धक्काच बसला.          पालघर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या वंदे मातरम अंध-अपंग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या सात-आठ वर्षांपासून चुरी काकांच्या सोबत काम करण्याचा योग आला. ते या संस्थेचे सल्लागार होते. अत्यंत संयमी आणि शांत स्वभावाचे चुरी काका संस्थेच्या कोणत्याही उपक्रमात स्वतःला झोकून देत होते. सामुदायिक विवाहाची संकल्पना समाजात रुजवण्यासाठी त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात पालघरमध्ये केली. दिव्यांग व्यक्ती शक्यतो विवाहास तयार होत नाहीत. या दिव्यांगांना विवाह करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सामुदायिक विवाह संकल्पनेतूनच दिव्यांगांच्या सामुदायिक विवाहाची संकल्पना पुढे आली. वंदे मातर...