Skip to main content

पालघर जिल्हा कलाध्यापक संघाच्या अध्यक्षपदी रुपेश वझे


        पालघर जिल्हा कलाध्यापक संघाच्या अध्यक्षपदी वाणगाव येथील ज. म. ठाकुर विद्यालयाचे कलाशिक्षक रूपेश वझे यांची सोमवारी (ता.3) निवड झाली. ते पालघर- ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचयाचे आहेत.
     महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या पालघर जिल्हा कलाध्यापक संघाची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर लगेच करण्यात आली. जिल्हा निर्मितीनंतर लगेच ठाणे जिल्हा कलाध्यापक संघातून वेगळे होऊन प्रफुल्ल घरत यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने पालघर कलाध्यापक संघाची स्थापना झाली. घरत यांच्या सेवानिवृती नंतर गेल्या तीन वर्षापासून माहीम येथील भुवनेश किर्तनेे विद्यालयाचे कलाशिक्षक विनय पाटील यांनी संघाची यशस्वी धुरा सांभाळली. विनय पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदी संघाचे उपाध्यक्ष वझे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ते विविध शैक्षणिक संघटनांशी संबंधित असून शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्याचं बालरक्षकचे अत्यंत महत्त्वाचे काम ते करत आहेत.
       गेल्या सहा वर्षांपासून कलाध्यापक संघाच्यावतीने
जिल्हास्तरीय कृतिसत्राचे नियमित आयोजन केले जाते. राज्य अधिवेशनात पालघर संघाचा मोठा सहभाग असतो. संघातर्फे मुलांसाठी रंगभरण, भेटकार्ड तयार करणे, आकाश कंदिल स्पर्धा इ. उपक्रमाचे आयोजन केले जाते. तर कलाशिक्षकांसाठी फलक लेखन स्पर्धा, पोस्टर स्पर्धा यांचे आयोजन करून त्यांनाही प्रोत्साहन दिले जाते. दरवर्षी जिल्ह्यातील तीन कला शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार दिला जातो. गेल्या काही दिवसांपूर्वी मयत कलाशिक्षक कै.गंगाराम चौधरी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबियांना सहकार्य केले आहे.
              वझे यांच्या निवडीबद्दल सोशल मीडियावर अभिनंदन होत असून यांच्याकडून संघाचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबवण्याची अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
- प्रमोद पाटील,
   एम.ए.बी.एड.
    पालघर
 

Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...