असा ही वाढदिवस... वाढदिवस आणि केक या दोघांचं अलीकडे घट्ट नातं आहे. वाढदिवस म्हटला की तो केक शिवाय साजरा करणे म्हणजे अवघडच. मात्र या गोष्टीला बगल देत दिव्यांगांसोबत वाढदिवस साजरा करतांना विशेष आनंद वाटला. पालघर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या आमच्या वंदेमातरम अंध-अपंग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या सात-आठ वर्षांपासून आमचे विविध उपक्रम सुरू आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये या उपक्रमांमध्ये खंड पडला. दिव्यांगां मार्फत चालवत असलेली आमची खानावळ बंद झाली. आता अगरबत्ती, मेणबत्ती, पेपरडिश आदी बनवण्याचे काम थोड्याफार प्रमाणात सुरू आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून आमच्या गाठीभेटी फार कमी झाल्या. वंदे मातरम अंध-अपंग सेवाभावी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. विनोद राऊत सर नेहमी संपर्कात असतात. पण वेळेअभावी भेटता येणे शक्य होत नाही. गेल्या दोन दिवसांपूर्वी राऊत सरांचा फोन आला की सर आपण कधी भेटणार आहात? मी दोन दिवसांनी भेटू असे सहजच सांगितले. राऊत सर म्हणजे अत्यंत हुशार व्यक्ती. कोणत्याही गोष्टीचा पाठपु...