Skip to main content

दिव्यांगांसोबत वाढदिवस...

    असा ही वाढदिवस...
    वाढदिवस आणि केक या दोघांचं अलीकडे घट्ट नातं आहे. वाढदिवस म्हटला की तो केक शिवाय साजरा करणे म्हणजे अवघडच. मात्र या गोष्टीला  बगल देत दिव्यांगांसोबत वाढदिवस साजरा करतांना विशेष आनंद वाटला.
      पालघर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या आमच्या वंदेमातरम अंध-अपंग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या सात-आठ वर्षांपासून आमचे विविध उपक्रम सुरू आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये या उपक्रमांमध्ये खंड पडला. दिव्यांगां मार्फत चालवत असलेली आमची खानावळ बंद झाली. आता अगरबत्ती, मेणबत्ती, पेपरडिश आदी बनवण्याचे काम थोड्याफार प्रमाणात सुरू आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून आमच्या गाठीभेटी फार कमी झाल्या. वंदे मातरम अंध-अपंग सेवाभावी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. विनोद राऊत सर नेहमी संपर्कात असतात. पण वेळेअभावी भेटता येणे शक्य होत नाही. गेल्या दोन दिवसांपूर्वी राऊत सरांचा फोन आला की सर आपण कधी भेटणार आहात? मी दोन दिवसांनी भेटू असे सहजच सांगितले. राऊत सर म्हणजे अत्यंत हुशार व्यक्ती. कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा कसा करावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांच्या संपर्कात असलेल्यांना याची कल्पना असेलच. दोन दिवसांनी अपेक्षेप्रमाणे  त्यांचा फोन आला. मीही येतो असे म्हटलं.
    संस्थेचे सफाळे येथे एका जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या अशा वास्तूमध्ये कार्यालय आहे. या कार्यालयातच स्वयंरोजगाराचे काम चालते. मात्र ज्या दिवशी मी संस्थेच्या कार्यालयात जाणार होतो तो दिवस होता १६ जून म्हणजेच माझा वाढदिवस. या दिवशी संस्थेच्या  कार्यालयात स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या दिव्यांगांना रिकाम्या हाती कसं भेटावं हा प्रश्न माझ्यासमोर होताच. मी एक शक्कल लढवली. राऊत सरांना संस्थेमध्ये किती स्वयंसेवक असतील त्यांची संख्या विचारली. आणि माझ्या एका खाणावळ चालवत असलेल्या मित्राला जेवणाची ऑर्डर दिली.
          दुपारी दीडच्या सुमारास मी आणि माझा मित्र संस्थेच्या कार्यालयात गेलो. तोपर्यंत जेवणाची ऑर्डर दिलेला खानावळवाला ही जेवण घेऊन आला होताएका बाजूने सोशल मीडियावर सकाळपासून माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. मात्र सोशल मीडियापासून दूर असलेल्या आमच्या दिव्यांग बंधू-भगिनींना याची कुठल्याही प्रकारे कल्पना नव्हती.
       दरम्यान, गेल्या मार्च महिन्यामध्ये माझ्या आजीचे दुःखद निधन झाले होते. तेव्हापासून मी संस्थेच्या कार्यालयात गेलो नव्हतो. संस्थेचे अध्यक्ष राऊत सरांनी मी तीन महिन्यानंतर कार्यालयात येणार असल्याने शोकसभा आयोजित केली होती . शोक सभेनंतर जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला. मात्र जेवणाच्या कार्यक्रमापूर्वी माझ्या मित्राला राहावले नाही. त्यांनी माझा वाढदिवस ही आज असल्याचे सांगताच सर्व दिव्यांग बंधू-भगिनींनी केक आणण्याचा आग्रह केला. मात्र मी त्याला नकार दिला. आयुष्यात प्रथमच अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करतांना अंतकरण आनंदाने भरून आले. दिव्यांग बंधू- भगिनींच्या सुद्धा चेहऱ्यावर आनंदाची छटा उमटलेल्या बघून खूप समाधान वाटले.
- प्रमोद पाटील, पालघर

Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...