Skip to main content

मातृभाषेतूनच सर्वोत्कृष्ट शिक्षण ; प्रमोद पाटील, मनोर येथील लालबहाद्दूर शास्त्री हायस्कूलमध्ये कार्यक्रम

 शिक्षणावर अपेक्षित खर्च आवश्यक ; प्रमोद पाटील 

मनोर येथील लालबहाद्दूर शास्त्री हायस्कूलमध्ये कार्यक्रम  



मनोर 

   आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जात असताना आपल्या देशात मात्र शिक्षणावर अपेक्षित  खर्च होत नाही. असा अभ्यासक्रम असायला हवा की शिक्षणातून खरा माणूस घडून त्याला योग्य व्यवसाय करण्यासाठी चालना मिळायला हवी असे परखड मत इंडोनेशिया येथील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत पालघर जिल्हयाचे नेतृत्व केलेल्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील यांनी मांडले आहे. 

      मनोर येथील जनरल एज्युकेशन सोसायटीच्या लालबहाद्दूर शास्त्री हायस्कूल व चाफेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा शुक्रवारी ( ता.14) वार्षिक पारितोषिक वितरण आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहाने पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रमोद पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना पाटील यांनी परदेशात आपल्या भाषेत शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध आहे. आपण मात्र इंग्रजी माध्यमाचा उगाचच अधिकच बाऊ करत असून मातृभाषेतूनच सर्वोत्कृष्ट शिक्षण मिळू शकते असे सांगून परदेशी शिक्षण पद्धती आणि भारतीय शिक्षण पद्धतीमधील फरक स्पष्ट केला.तसेच विद्यार्थ्यांना परिस्थितीला दोष न देता सकारात्मक विचार करून जीवनात मार्गक्रमण करा असा सल्ला दिला. 

 या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आमदार राजेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना तुमचे निरामय जीवन शालेय स्तरावर संपले असून पुढील जीवनात जिद्द आणि संघर्ष करण्यासाठी सदैव तयार राहा.परिश्रम हीच यशाची गुरू किल्ली आहे हे विसरू नका असे सांगितले.तर विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद सदस्य विष्णू कडव यांनी विद्यार्थ्यांनी नेहमी नम्र राहून चांगल्या गोष्टी साठी मोबाईल चा वापर करावा असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

      या वेळी इयत्ता दहावी च्या बोर्डाच्या परिक्षेत गेल्या वर्षी नेत्रदीपक यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केलेल्या विद्यार्थ्यांना विविध दात्यांकडून रोख रक्कम पारितोषिक म्हणून देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अशोक भामरे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय महेश भोईर यांनी केला. संस्थेचे सचिव संजय मळेकर, अध्यक्ष सुनिल लोखंडे यांनी मार्गदर्शन  केले.

         या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय चंपानेकर,खजिनदार रविंद्र घोलप, शालेय समितीचे अध्यक्ष संतोष लोखंडे, संस्थेचे  माजी अध्यक्ष राजाभाऊ एडवणकर, सतिश लोखंडे, प्रशांत घोसाळकर व आजी माजी पदाधिकारी, सदस्य,दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.  

चौकटीत-

 बोईसर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार राजेश पाटील यांनी पालघर जिल्हयात लवकरच पाईप लाईनने गॅस पुरवठा केला जाईल असे सांगून जिल्हयात शिक्षणाची अवस्था गंभीर झाली आहे या बाबतीत लक्ष दयावे लागेल असे आश्वासन दिले    

Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...