Skip to main content

पालघर तालुक्यातील शालेय कबड्डी स्पर्धा

पालघर तालुक्यातील शालेय कबड्डी स्पर्धा 

जीवनात येणारया असंख्य अडचणी आणि बिकट परिस्थितीत योग्य आणि अचूक  मार्ग काढण्यासाठी कबड्डी खेळ उपयुक्त असून अलिकडे या खेळाला महत्व प्राप्त होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे असे प्रतिपादन बोईसर एज्यूकेशन चे कार्यवाह शेखर महंते यांनी केले.
       पालघर तालुका आयोजित 14/17/19 वयोगटाच्या  आंतरशालेय कबड्डी  स्पर्धांचे  आयोजन येथील स दा वत॔क विद्यालयाच्या मैदानावर सोमवारी  (ता.25) करण्यात आले होते. या  स्पर्धांचे  उदघाटन महंते यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना महंते यांनी खेळमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याने अभ्यासा बरोबरच खेळाला महत्व देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.
              या वेळी तालुका केंद्र प्रमुख राम पाटील, पालघर जिल्हा मुख्याध्यापक अध्यक्ष  डॅरेल डिमेलो, पालघर तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील , पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक विलास पाटील, जेष्ठ क्रीडा शिक्षक राजन घरत, तालुका उपकेंद्र प्रमुख आशिष पाटील , मनिषा तारवी ,प्रकाश पळसूळे , कमळाकर पाटील  व तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते..
     तालुकयातील 44 शाळेतील 14/17/19 वयोगटातील  105 संघ सहभागी झाले तालुका पातळीवर झालेल्या आंतर शालेय कबड्डी स्पर्धेत सफाळे विभागाने बाजी मारली असून सहा पैकी तीन फायनल मारून कबड्डी स्पर्धेत नाव कमाविले आहे. 
       या क्रीडा स्पर्धेत 14 वयोगटातील सफाळे विभागाने माकणे येथील त्रिमूर्तीं विद्यालयाच्या मुलींनी , 17 वर्षे वयोगटातील केळवारोड येथील विद्या वैभव विद्यालयातील मुलांनी तर 19 वर्षे वयोगटातील सफाळे येथील निखिल राजन घरत कनिष्ठ महाविद्यालयीन मुलींच्या संघांनी अंतिम विजेतेपदे पटकावले आहे. 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या बोईसर सेवाश्रम विद्यालयातील मुलांच्या तर 17 वयोगटातील मुलींच्या लोलोंडे  येथील अधिकारी विद्यालयाच्या तर 19 वर्षे वयोगटातील पालघर येथील सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयांना च्या मुलांच्या संघाने विजेतेपदे पटकावले.



विजयी संघांचे अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...