कला शिक्षक कृतीसत्र , पालघर
शालेय जीवनात कला- क्रीडा शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून या शिक्षकांनी केलेल्या संस्कारांमुळे यशस्वी माणूस घडतो असे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांनी केले.
पालघर जिल्हा कलाध्यापक संघ आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने मंगळवारी (ता. 26)जिल्ह्यातील कला शिक्षकांचे एका दिवसाचे कृतीसत्र पालघर येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी भवन मध्ये संपन्न झाले. या कृतीसत्राच्या उदघाटन प्रसंगी खरपडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट कौशल्य आंणि जिद्द असून त्यांना दिशा देण्याचे काम शिक्षकच करू शकतो असे सांगून आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
या वेळी पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी कला शिक्षकांना अतिरिक्त करू नये अशी भूमिका शासनाने घेतली असून कला आणि क्रीडा शिक्षकांच्या कमी केलेल्या तासिका पूर्ववत करण्याचे आश्वासन शालेय शिक्षण व क्रीडा मंत्र्यांनी दिले आहे असे सांगितले. तसेच जिल्ह्यातील विविध उपक्रम यशस्वी पणे राबवण्यासाठी कला -क्रीडा शिक्षक सदैव आघाडीवर असल्याचे सांगितले. या वेळी चोपडा ( जळगाव ) येथील कलाध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी कृतीसत्राला मार्गदर्शन करताना शासनाच्या शिक्षण धोरणा बरोबरच शिक्षकांच्या विविध जबाबदारया काय आहेत? हे पटवून दिले.
या वेळी पालघर जिल्हा कलाध्यापक संघांचे अध्यक्ष प्रफुल्ल घरत यांनी प्रास्ताविक केले.तर शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष अनिल शेलार, पालघर तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील ,जिल्हा अध्यक्ष अजय राऊत आदींनी शिक्षकांच्या व्यथा मांडल्या.
या वेळी प्रत्येक तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणारया कला शिक्षकांचा तसेच सन 2016 मध्ये राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील व गणेश प्रधान यांच्यासह कला शिक्षक ज्ञानेश्वर माळी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी जिल्हा परिषद सदस्या मनिषा गोरखाना, कलाध्यापक संघांचे कार्यवाह विनय पाटील,उपाध्यक्ष महेंद्र पवार, एन.डी. वाघ, विजय जोगमागॆ,सहकार्यवाह ज्ञानेश्वर माळी, खजिनदार भास्कर खेडकर यांच्या सह पदाधिकारी आणि जिल्ह्यातील कला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले.

Patil sir great work.
ReplyDeleteIdeal and great work
ReplyDeleteThanks sir
ReplyDelete