विद्यार्थ्यांच्या अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा विद्यार्थ्यांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. अर्थातच समाज वर्तनाचा विद्यार्थ्यांवर खोलवर असा परिणाम आपल्याला दिसून येतो.
यासाठी प्रथम आपल्याला वर्तन म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक वाटते. खरंतर, वर्तन ही संकल्पना मानसशास्त्रा मधून समाजशास्त्रा
मध्ये आली आहे. वर्तन म्हणजेच माणसाची वर्तणूक. एखाद्या प्रसंगी माणूस जी क्रिया किंवा कृती करतो अर्थातच वर्तणूक करतो त्यालाच आपण त्याचे "वर्तन" असे म्हणतो. तर भावनिक प्रतिक्रिया जसे हसणे- रडणे हा देखील वर्तनाचा एक भाग म्हणता येईल.
मानसशास्त्रात वर्तन म्हणजे काय? तर वर्तन म्हणजे वर्तणूक किंवा वागणूक ही एक सामान्य संज्ञा आहे. जी क्रिया, क्रियाकलाप, प्रतिक्रिया, हालचाली, प्रक्रिया, ऑपरेशन्स इत्यादींचा समावेश करते. थोडक्यात, आपल्याला शरीराची कोणतीही मोजण्यायोग्य प्रतिक्रिया कसं म्हणता येईल . मानसशास्त्रात, कोणत्याही उत्तेजनामुळे उद्भवलेल्या जीवाच्या प्रतिसादाला कॉल करण्याची प्रथा आहे. सहसा सर्व हालचाली आणि क्रिया काही आवेग, धक्क्यांच्या प्रतिसादात उद्भवतात, ज्याला आपण त्या कृतीचे कारण म्हणतो. वर्तन हे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाच्या साक्षात्काराचा एक प्रकार आहे. वर्तणूक हा जीवावर अस्तित्वाच्या बाह्य परिस्थितीच्या क्रियेमुळे होणाऱ्या प्रतिक्रियांचे एक जटिल आहे; हे सजीव आणि निर्जीव निसर्गाच्या वस्तूंच्या संबंधात, वैयक्तिक व्यक्ती किंवा समाजाशी संबंधित कृतींचा एक संच आहे. वर्तन हे मानसिक क्रियाकलापांचे बाह्य प्रकटीकरण म्हणून समजले जाते. "क्रियाकलाप" ही संकल्पना "वर्तन" च्या संकल्पनेपेक्षा खूप व्यापक आहे आणि त्यात एक अविभाज्य भाग म्हणून समाविष्ट आहे. या संदर्भात, वागणूक चेतनेशी अंतर्गत, व्यक्तिपुरक अनुभवी प्रक्रियेचा संच म्हणून विरोधाभासी आहे. अन्यथा, वर्तनाचे तथ्य आणि चेतनेचे तथ्य त्यांच्या ओळखीच्या पद्धतीनुसार घटस्फोटित होतात. वर्तणूक बाह्य जगात होते आणि बाह्य निरीक्षणाद्वारे शोधली जाते, तर चेतनाची प्रक्रिया विषयाच्या आतील जगात पुढे जाते आणि आत्म-निरीक्षणाद्वारे शोधली जाते. त्यामुळे वर्तन हा भाग अत्यंत महत्वाचा समजला जातो.
मुलांना सर्वच गोष्टी आपण घरी शिकवू शकत नाही. त्यासाठी समाजाला शिक्षण देण्याच्या प्रमुख उद्देशाने शाळा या औपचारिक संस्थेची निर्मिती झाली आहे. विशिष्ट वयोगटातील मुलांना शिक्षण देऊन त्यांच्या जाणिवांचा विकास करणे हे शाळांचे प्रमुख काम आहे. शाळा ही समाजाची प्रतिकृती म्हणून ओळखली जाते. कारण समाजातील लोक आपले ध्येय व उद्दिष्टे निश्चित करून त्यांच्या पूर्ततेसाठी शाळेच्या माध्यमातून त्यांचा प्रयत्न असतो. एखादं मुल जितकं शाळेत शिकतं तितकच ते आपल्या घरी किंबहुना त्यापेक्षा अधिक ते मुल आपल्या समाजामध्ये शिकत असतं. कारण विद्यार्थी शाळेमध्ये फक्त पाच ते सहा तास असतो. त्याचा अधिकाधिक वेळ हा शाळेच्या बाहेर म्हणजेच समाजामध्ये व्यतीत होत असतो. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक घटना तो जवळून पाहत असतो. त्या प्रत्येक घटनेचे उत्तर किंवा ही घटना का घडते हे जरी त्याला कळत नसले तरी त्या घटनेचे बाह्य स्वरूप मात्र त्याच्या मनावर प्रतिबिंबित होत असते. त्यामुळेच समाज वर्तनाचा विद्यार्थ्यांवर फार मोठा परिणाम होत असतो.
एक उदाहरण द्यायचे झाले तर, केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई ऑलम्पिक स्पर्धेत शेवटच्या फेरीमधे धावतांना अंतिम रेषेपासुन फक्त काही मीटर दूर होता. त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते, अबेलने सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते. सर्व प्रेक्षक त्याच्या नावाचा जल्लोष करीत होते. तेवढ्यातच तो अंतिम रेषा समजून अंतिम रेषेच्या एक मीटर आधीच थांबला. मागुन येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या लक्षात आले की, अंतिम चिन्ह न समजल्यामुळे तो अंतिम रेषेच्या आधीच थांबला आहे. त्याने ओरडुन अबेलला पुढे जाण्यास सांगितले. पण स्पॅनिश समजत नसल्याने तो हलला नाही. शेवटी इव्हानने त्याला ढकलुन अंतिम रेषेपर्यंत पोचविले. त्यामुळे अबेल पहिला व इव्हान दुसरा आला.
तदनंतर पत्रकारांनी इव्हानला विचारले, "तू असे का केलेस? तुला संधी असतांना तू पहिला क्रमांक का घालवलास ?" इव्हान ने सांगितले, माझे स्वप्न आहे की एक दिवस आम्ही अशी मानव जात बनू जी एकमेकांना मदत करेल. आणि मी पहिला क्रमांक घालविला नाही.
रिपोर्टर पुन्हा म्हणाला, पण तू केनियन स्पर्धकाला ढकलुन पुढे आणलेस ? यांवर इव्हान म्हणाला, तो पहिला आलेलाच होता ही रेषा त्याचीच होती !
पण रिपोर्टर पुन्हा म्हणाला, "पण तू सुवर्ण पदक जिंकू शकला असतास ! त्या जिंकण्याला काय अर्थ होता ? माझ्या मेडलला मान मिळाला असता ? पण माझी आई काय म्हणाली असती ? संस्कार हे पिढी दर पिढी पुढे - पुढे जात असतात. मी पुढच्या पिढ्यांना काय दिले असते ? दुसऱ्यांच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा न घेता त्यांना मदत करण्याची शिकवण माझ्या आईने मला दिली आहे. म्हणजेच त्या खेळाडूचे त्या परिस्थितीतील वर्तन हे त्या खेळाडूवर झालेल्या संस्कारांमुळे झालेले आहे, हे आपल्या लक्षात येईल. त्या परिस्थितीत या खेळाडूचे वर्तन अत्यंत महत्त्वाचे आहे.
आज सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होताना आपल्याला दिसतो. सोशल मीडियावर आलेल्या बारीक-सारीक गोष्टी ह्या मानवी मनावर परिणाम करत असतात. कोणतीही एखादी गोष्ट प्रमाणापेक्षा अधिक होत असेल किंवा केली जात असेल तर त्याला आपण व्यसन म्हणतो. तशाच पद्धतीने आज अनेक जण सोशल मीडियाच्या "व्यसनात " अडकले आहेत. आपल्या आरोग्यापेक्षा सोशल मीडिया आता लोकांना अधिक भुरळ घालतो. या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या बालमनावर निश्चितच मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो.
आज विद्यार्थी आणि समाज या दोघांमध्ये प्रचंड दरी आपल्याला अनुभवायला मिळते. ही दरी विचारांची दरी आहे. ही दरी संस्काराची आहे. आजची मुलं आपल्या आई - वडिलांपेक्षा आपल्या मित्रमैत्रिणींच्या वागण्यावर- बोलण्यावर अधिक भरोसा ठेवतात. आणि म्हणूनच आजचा विद्यार्थी आणि समाज या दोघांमध्ये प्रचंड दरी निर्माण होण्याची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.
@ भाषा:- समाज आणि विद्यार्थी या दोघांमध्ये दरी निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे भाषा. आपल्या घरामध्ये एक भाषा बोलली जाते तर विद्यार्थी आपले शिक्षण ज्या शाळेत किंवा महाविद्यालयात घेत असतो तेथे दुसरी भाषा असते. त्यामुळे विद्यार्थ्याला शाळेत सहजगत्या व्यक्त होता येत नाही. बऱ्याच गोष्टी त्याला व्यक्त करायच्या असतात पण तो व्यक्त होऊ शकत नाही. आपल्या चालीरीती, आपली संस्कृती या गोष्टींना तो विद्यार्थी मुकतो. किंबहुना या सर्व गोष्टींपासून तो दूर जातो. त्यामुळे त्यांना आपल्या संस्कृतीपेक्षा पाश्चात्त्य संस्कृतीचे आकर्षण अधिक वाटते.
@ विभक्त कुटुंब पद्धती :- आज "हम दो हमारे दो" या विचाराने एकत्र कुटुंब पद्धतीचा लोप होऊन विभक्त कुटुंब पद्धती अगदीच वाऱ्यासारखी फोफावत आहे. मुलांना लहानपणी जे संस्कार सहजगत्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मिळत होते हे संस्कार आज आई-वडील दोघेही नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर असल्याने मुलांना मिळणे अशक्य झाले आहे. घरामध्ये आई आणि वडील आपल्या कामामध्ये मग्न असल्याने मुलांशी त्यांचा संवाद पाहिजे तितक्या प्रमाणात होत नाही. मुलांना मैदानी खेळ नाहीत. त्यामुळे बहुसंख्य मुलंही आज एकलकोंडी बनत आहेत. या सर्व गोष्टींचा त्यांच्या वर्तनावर खूप मोठा परिणाम होत आहे.
@ संपर्क साधने :- आज मुलांना सर्व गोष्टी अगदी सहजगत्या मिळत आहेत.एकमेकांच्या बरोबर संपर्क साधण्यासाठी माध्यमं वाढताहेत. आज बहुसंख्य मुलांना सामाजिक गोष्टींमध्ये इंटरेस्ट वाटत नाही. मुलं प्रोफेशनल बनत आहेत. मुलांनी प्रोफेशनल बनायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही. मात्र ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो आहेत त्या समाजाचे काही आपण देणे लागतो हे विसरता कामा नये. किंबहुना निस्वार्थीपणाची भावना त्यांच्या मनात उत्पन्न व्हायला हवी. दुर्दैवाने असे होत नाही.
@ स्थलांतर:- ज्या मातीत आपण जन्माला आलो आहोत त्या मातीशी आपलं एक वेगळं असं नातं असतं. मात्र शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने जेव्हा स्थलांतर होतं तेव्हा दुसऱ्या ठिकाणी स्थिरस्थावर होताना इतका स्नेह राहत नाही. तेथील प्रत्येक गोष्ट सहजगत्या स्वीकारायला तयार होत नाही. कालांतराने अप्रत्यक्षरीत्या माणूस आपली संस्कृती विसरत जातो. आणि केवळ भौतिक सुखासाठी तो जगत असतो. साहाजिकच या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या वर्तनावर परिणाम होत असतो. म्हणूनच स्थलांतर हा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांच्या वर्तनावर परिणाम घडवून आणतो.
आजच्या पिढीने जात-धर्म याची बंधने बऱ्यापैकी झुगारून दिली आहे. विविध जाती- धर्मा बरोबरच समोरची व्यक्ती किती श्रीमंत- गरीब आहे हे पाहिलं जात नाही. केवळ समविचारी व्यक्ती बरोबर आपले स्नेह वृद्धिंगत केले जात आहेत. निश्चितच हे एक विधायक पाऊल आहे असं म्हणावं लागेल. साकल्याने विचार करता समाज विचारांचा- वर्तनाचा विद्यार्थ्यांच्या मनावर खोलवर असा परिणाम होत असतो. शेवटी हे सांगावं लागेल “सर्व्हायवल आँफ फिटेस्ट” म्हणजे जो सक्षम असेल तो टिकेल, जो सक्षम नसेल तो नष्ट होईल, हा निसर्गाचा नियम आहे. तो कठोरपणे पाळला जातो.
🔸 प्रमोद भालचंद्र पाटील
शिक्षण अभ्यासक
तथा
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक
- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment