Skip to main content

आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांने शिक्षकांना मिळणार दुय्यम सेवा पुस्तिका



रायगड जिल्हा परिषदेच्या
शिक्षकांना दिलासा मिळणार

आमदार निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याने विविध निर्णय

प्रमोद पाटील
केळवे वार्ताहर ता. 18
: रायगड जिल्ह्यातील शिक्षकांना दिलासा देणारे अनेक निर्णय जिल्हा परिषदेकडून घेण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेतील ११६ शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव ३० नोव्हेंबरपर्यंत मंजूर करण्याबरोबरच वैद्यकीय बिले मंजूर करण्यासाठी उद्यापासून विशेष शिबिर घेण्यात येणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याने विविध निर्णय झाले आहेत.

रायगड जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आमदार निरंजन डावखरे यांच्या मागणीनुसार जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात सहविचार सभा घेण्यात आली. या सभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात यांच्यासह वेतन पथकाचे अधिकारी उपस्थित होते. या सभेला शिक्षक परिषद व अन्य शिक्षक संघटनांचे प्रतिनिधींचीही उपस्थिती होती.

जिल्हा परिषदेच्या ११६ शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव प्रलंबित असल्याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. त्यानंतर येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक शिक्षकांची वैद्यकीय बिले रखडली आहेत. या बिलांना मंजूरी देण्यासाठी विशेष शिबिर घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी दिले. अंशकालीन निवृत्तीवेतन योजनेतील १ हजार ८२३ शिक्षकांच्या स्लिपांचे वाटपही केले जाणार आहे. संस्थेतील वादामुळे बढती रखडलेल्या शिक्षकांबाबत सरकारी नियमानुसार आठ दिवसांत निर्णय घेतला जाईल. तसेच निवृत्त व ५५ वर्षांवरील शिक्षकांनी एमएससीआईटी प्रशिक्षण न केल्याने होणारी वसुली थांबविण्याचाही निर्णय घेण्यात आला. मुल्यांकन पात्र शाळांचे प्रस्ताव लगेचच उपसंचालकांकडे पाठवावे, ३० जूनपूर्वी २०१६ पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी द्याव्यात, अल्पसंख्याक शाळातील अनुकंपा नियुक्तीला मान्यता, १३ शाळांचे दर्जावाढ करण्याबाबत प्रस्ताव त्वरीत उपसंचालकांकडे पाठविणे, मूल्यांकनास पात्र शाळांचे प्रस्ताव लगेचच सरकारकडे पाठविणार आदी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या सभेत काही शिक्षकांकडून वैयक्तीक मान्यता, शिक्षण सेवक सातत्य, शालार्थ आयडी आदींबाबतही मागण्या करण्यात आल्या. त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

अन्य जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात समायोजन झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना मुक्त करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यावलकर यांनी स्पष्ट केले. न्यायालयीन निर्देशानुसार शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात येईल, असे यावलकर यांनी स्पष्ट केले.

----------------------------

रायगडमधील शिक्षकांना 

दुय्यम सेवा पुस्तिका

रायगड जिल्ह्यातील शिक्षकांना दुय्यम सेवापुस्तिका देण्यात येणार आहे. या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांकडून मुख्याध्यापकांना पत्र पाठविले जाणार आहे. त्यानंतर शिक्षकांना दुय्यम सेवा पुस्तिका उपलब्ध होतील. काही वेळा सेवापुस्तिका गहाळ झाल्यामुळे शिक्षकांची अडचण होत होती. मात्र, आता शिक्षकांकडे दुय्यम प्रत राहणार आहे.



Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...