ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळणे आवश्यक- कोकण विभाग पाटबंधारे विकास उपाध्यक्ष जगदीश धोडी, चहाडे क्रीडा संकुलात तीसरया लीगचे शानदार उदघाटन
प्रमोद पाटील
केळवे वार्ताहर ता. 21
ग्रामीण भागातील खेळाडूंकडे प्रचंड इच्छाशक्ती आणि जबरदस्त काटकपणा असून त्यांना योग्य वेळी योग्य संधी उपलब्ध झाली तर ते त्या संधीचे सोने करतात. सुदैवाने आजही ग्रामीण भागात मोकळी मैदाने उपलब्ध आहेत हे त्यांचे भाग्य आहे असे प्रतिपादन कोकण विभाग पाटबंधारे विकास विभागाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी केले.
पालघर कुणबी कला- क्रीडा प्रतिष्ठान आयोजित कुणबी प्रिमीयर लीगचे आयोजन चहाडे क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. या लीगचा उदघाटन समारंभ बुधवारी (ता.21 मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या धोडी यांनी शासनाच्या विविध योजनांमध्ये मैदाने विकास करण्यासाठीफंड उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात वेगवेगळ्या क्रीडा प्रकारच्या स्पर्धा आयोजीत करून या खेळाडूंना संधी मिळेल देणे आवश्यक आहे असे सांगितले.
या स्पर्धांचे उदघाटन समाजभुषण तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान चालणारया या सपरधैत 12 संघ सहभागी झाले असून एकूण 37 सामने खेळले जाणार आहेत. प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच बक्षीस दिले जाणार आहे. लीगचे हे तिसरे वर्ष आहे.
लीगच्या उदघाटन प्रसंगी लीगचे अध्यक्ष करविंद पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र पाटील, संचालक मधुकर पाटील,पालघर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नागेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते परशुराम चावरे , राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संतोष पावडे,सामाजिक कार्यकर्ते एकनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते ऊमेश पाटील, लीगचे सचिव सुनिल शेलार, उदयोजक चेतन पाटील, सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे माजी अध्यक्ष हरेश्वर नाईक , चहाडे, गावचे माजी उपसरपंच अजय पाटील, पोलिस पाटील तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या लीगचे प्रास्ताविक लीगचे विश्वस्त भावेश पावडे यांनी केले. या वेळी त्यांनी लीग भविष्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनशी सलग्न होऊन सिजन क्रिकेट लीग भरवण्याचा मनोदय व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक जतिन कदम व प्रतिभा कदम यांनी केले. या वेळी लीगचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कुणबी कला क्रिडा प्रतिष्ठान(KPL)
केपीएल-3 कुणबी प्रिमियर लीग च्या तिसरया पर्वासाठी सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे.
आर ए चॅम्पियन्स चहाडे
1) संघमालक- उत्तम पाटील, चहाडे
आयकाॅन- गणेश नाईक
पी एस कुणबी किग्स
2) संघमालक- प्रशांत सातवी, कुडे
आयकाॅन- समिर पाटील, कुकडे
शिवतेश बी बी वाॅरीयर्स काटाळे
3) संघमालक- बिपीन पाटील, काटाळे
आयकाॅन- रूपेश पाटील, कुकडे
ए पी एम वाॅरीयर्स आंबेदे
4) संघमालक- संतोष घरत, आंबेदे
आयकाॅन- मिलिंद पाटील, गिराळे
विपुल रायझिंग स्टार
5) संघमालक- विपुल पाटील, वरई
आयकाॅन- प्रितम पाटील, गिराळे
गैलाई स्टार्स, नावझे
6)संघमालक-पपेश पाटील, नावझे
आयकाॅन- गिरीष पाटील, गोवाडे
सह्याद्री शिलेदार
7) संघमालक- नागेश पाटील, तांदुळवाडी
आयकाॅन-सागर जाधव, केव
गोवाडे वाॅरीयर्स.
8) संघमालक- सचिन पाटील, गोवाडे
आयकाॅन- हितेश पाटील, उर्से
ए जे फायटर्स कुकडे
9) संघमालक- जयेश पाटील, कुकडे
आयकाॅन- आदित्य घरत, घरतपाडा
अथर्व वाॅरीयर्स बोरशेती
10) संघमालक- प्रितम आंबेकर, बोरशेती
आयकाॅन- तुषार पडवळे, केव
कोकणेर ब्लास्टर्स
11) संघमालक- अंकित पाटील, कोकणेर
आयकाॅन- हितेश पाटील, कोकणेर
ईशांत स्टायकर्स
12) संघमालक- संतोष पाटील, दहिसर
आयकाॅन- भाविक पाटील, हालोली
Comments
Post a Comment