Skip to main content

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड निरंजन डावखरे यांचा पालघर दौरा शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अॅड. निरंजन डावखरे

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड निरंजन डावखरे यांचा पालघर दौरा
शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार  अॅड.  निरंजन डावखरे

(प्रमोद पाटील)
   पालघर:  विद्यार्थ्यांनी प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी सतत धडपड करायली हवी. पाच जिल्हयांमिळून विस्तीर्ण असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात विविध समस्या आहेत. मात्र या भागातील जनतेने पुन्हा मला निवडून देऊन माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही असे प्रतिपादन आमदार अॅड निरंजन डावखरे यांनी केले. 

       पालघर जिल्हयातील शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी, जाणून घेण्यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी गुरुवारी ता. 25 ऑक्टोबर 2018 रोजी पालघर व वसई तालुक्याचा धावता दौरा केला. गुजरात राज्याच्या सीमे पासून गोव्याच्या सीमे पर्यंत विखुरलेला कोकण पदवीधर मतदारसंघ आहे. 

            सफाळे येथील विद्याभवन विदयालय एडवण येथे झालेल्या सत्कार समारंभात सत्काराला उत्तर देताना डावखरे यांनी आजच्या विद्यार्थ्यांला विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाव असून विद्यार्थ्यांनी नेहमी चौकस राहून त्याचे सोने करणे आवश्यक आहे असे सांगितले. 

        आदर्श शिक्षण संस्थेचे कार्यवाह चंदुलाल घरत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांच्या समवेत पालघर  लोकसभा विस्तारक बाबजी काटोळे, मेघराज शिक्षण संस्थेचे कार्यवाह  चंदुलाल घरत, श्री ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुजित पाटील, ठाणे -पालघर  जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पी. टी. पाटील, माजी अध्यक्ष प्रमोद पाटील , संतोष जनाथे व मान्यवर उपस्थीत होते.

     या वेळी पालघर तालुक्यातील लोकनायक जयप्रकाश नारायण विदयालयात संस्थेचे पदाधिकारी संस्थेचे कार्याध्यक्ष चिंतामण ठाकूर, कार्यवाह विश्वनाथ पाटील, मुख्याध्यापिका संगिता गावड , जेष्ठ कार्यकर्ते संजिव म्हात्रे आदी उपस्थित होते. त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आमदार डावखरे यांना दिले तर माध्यमिक शिक्षक पतपेढी भवन येथे माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पी. टी. पाटील, कार्यवाह गणेश प्रधान, पतपेढीचे अध्यक्ष संतोष पावडे, शिक्षक परिषदेचे शशिकांत चौधरी, विद्या सेवक पतपेढीचे अध्यक्ष सुधीर घागस, माध्यमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष प्रमोद पाटील, पतपेढीचे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते. या सभेमध्ये डावखरे यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध अडचणी समजावून घेतल्या. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी शिक्षकांची प्रलंबित असलेली प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील असे आश्वासन दिले.

        बोईसर येथील स. दा. वर्तक विदयालयात शिक्षक व संस्था चालक यांच्या झालेल्या संयुक्त सभेत पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॅरेल डिमेलो यांनी बहुल आदिवासी असलेल्या पालघर जिल्ह्याला मुंबईला न जोडता नाशिकला जोडावे. म्हणजे ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळेल असे सांगून पालघर जिल्हयासाठी वेतन पथक व लेखाधिकारी कार्यालय सुरू करण्यात यावे अशी मागणी केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालघर तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केले. 

           या वेळी बोईसर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार वर्तक , कार्यवाह अविनाश चुरी, लोकसभा निवडणुक विस्तारक सामाजिक कार्यकर्ते बाबजी काटोळे,विद्यासेवक पतपेढीचे अध्यक्ष सुधीर घागस,पालघर तालुका क्रीडा केंद्र प्रमुख राम पाटील, तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुधाकर ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. 
    आमदार अॅड निरंजन डावखरे यांनी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. 
यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...