प्रमोद पाटील
केळवे वार्ताहर ता. 24
भारतात सुरू असलेली लाॅर्ड मॅकेलियो शिक्षण पद्धती कालबाह्य झाली असून ती मोडीत काढून शिवाजी महाराजांचा आदर्श असलेला अभ्यासक्रम आवश्यक आहे. म्हणुनच मातृभाषा डोळे तर इंग्रजी भाषा चष्मा आहे. विद्यार्थ्यांनी मातृभाषेतूनच शिक्षण घेणं आवश्यक आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.
तारापूर एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव सोहळा शनिवारी(ता.24) तारापूर येथे संपन्न झाला. या सोहळ्यास प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित असलेल्या तावडे यांनी गेल्या चार वर्षात आपण शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचे निर्णय घेतले आहेत हे सांगताना दहावीत नापास होणारया विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून जुलै महिन्यातच फेरपरीक्षा सुरू केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्या बरोबरच गुन्हेगारीकडे वळणारया विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले. तर दहावीत नापास होणारया विद्यार्थ्यांना दहावी नापास हा शिक्का न मारता कौशल्य विकासासाठी पात्र असे प्रमाणपत्र दिले जात आहे. सदयाची शिक्षण पद्धती ही संवादावर आधारित आहे. या शैक्षणिक पद्धतीत शिक्षकांने विद्यार्थ्यांना मारणे हा गुन्हा आहे. हरयाणा येथे घडलेल्या दुष्कृत्यामुळे राज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक झाले आहे हे सांगताना तावडे यांनी किशोर वयीन मुलांसाठी लैगिंग शिक्षणाला होत असलेल्या ओरडीमुळे राज्यात अविरत प्रशिक्षण सुरु असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रात लवकरात लवकर राज्य पहिल्या क्रमांकावर येईल.देशातील तेराव्या क्रमांकावर असलेले महाराष्ट्र राज्य आज तिसरया क्रमांकावर आले आहे. तसेच राज्यात पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना लवकरच ओपन बोर्ड परीक्षा सुरू करण्याची घोषणा तावडे यांनी केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तारापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरेश्वर सावे हेे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ किरण सावे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या संस्थांचा सत्कार करण्यात आला तसेच संस्थेच्या अमृत महोत्सवा निमित्ताने स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पालघर जिल्हयाचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, आमदार पास्कल धनारे, संस्थेचे विश्वस्त सुभाष सावे, कार्यवाह उदयन सावे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण मंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे-
- गोव्यात मुख्यमंत्री शिक्षण मंत्री खाते सांभाळत आहेत.
- गेल्या दोन वर्षांत राज्यातील सुमारे 30 हजार विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला
- राज्यातील 67827 शाळा ज्ञान रचनावादी
- 4381शिक्षकांनी मोबाईल अॅपचा शोध व वापर
- राज्यात बहुतांश डिजिटल शाळा
- टेक्नोसेव्ही शिक्षकांवर भर
-35345 विद्यार्थी दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण
-भारतात लाॅड मॅकेलियो शिक्षण पद्धती संपविण्याचा निर्णय
-शिवाजी महाराज म्हणजे उत्कृष्ट नियोजन कर्तै
- मूल्यवर्र्धीत शिक्षणाला महत्व
-*संवाद शिक्षण मंत्र्यांशी*-
यावेळी पालघर जिल्हयातील सुमारे अकराशे विद्यार्थ्यांचा संवाद शिक्षण मंत्र्यांशी हा कार्यक्रम झाला.
या वेळी विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत बेस्ट फाईव्ह आहे का , शैक्षणिक सहलींना शासनाने परवानगी द्यावी, बारावी पेक्षा दहावीचा अभ्यास क्रम कठीण का?, भारतीय वैज्ञानिक भारता बाहेर जाऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना कराल? आदी प्रश्न विचारले असता शिक्षणमंत्री तावडे यांनी अत्यंत समाधानकारक उत्तरे देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांनी " तो तो चांन" (जपानी पुस्तक) अवश्य वाचावे असे सांगून महिन्यातून एकदा नो गेजेट हा संकल्प करावा असे आवाहन केले.
यावेळी खासदार राजेंद्र गावीत, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ व जिल्हयातील शिक्षक उपस्थित होते.
Comments
Post a Comment