समाजाची सेवा करण्याची हीच खरी संधी:, डॉ. दीपक चौधरी यांचे प्रतिपादन, लायन्स क्लब ऑफ सफाळे अध्यक्षपदी ॲड. तारानाथ वर्तक
समाजाची सेवा करण्याची हीच खरी संधी:, डॉ. दीपक चौधरी यांचे प्रतिपादन, लायन्स क्लब ऑफ सफाळे अध्यक्षपदी ॲड. तारानाथ वर्तक
पालघर...
कोरोनाच्या जागतिक आपत्तीमुळे सामान्य माणूस खचला असून या सामान्य माणसाला उभा करण्यासाठी लायन्स क्लब अहोरात्र झटत असून स्वतःची काळजी घेत समाजाची सेवा करण्याची हीच खरी संधी आहे असे भावनिक मत पास्ट डिस्टिक गव्हर्नर डॉक्टर दीपक चौधरी यांनी व्यक्त केले.
सफाळे लायन्स क्लबच्या 2020-2021 वर्षासाठी पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ रविवारी (तारीख 26) ऑनलाइन पद्धतीने झाला. या पदग्रहण समारंभाचे प्रमुख अधिकारी म्हणून डॉ.चौधरी बोलत होते. राज्यावर कोसळलेल्या संकटामुळे सामान्य माणूस पुरा खचला आहे. या सामान्य माणसाला उभा करण्यासाठी लायन्स क्लब च्या माध्यमातून पन्नास लाखांचा प्रकल्प उभा करून मुंबईतील डबेवाल्यांना तसेच मावळ तालुक्यात चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची दखल घेऊन तेथील आपद्ग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत कार्य करण्यात आले. भविष्यातही लायन्स क्लब कोरोनाच्या लढाईत पुढे राहील असे आश्वस्त करून नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
लायन्स क्लब ऑफ सफाळे अध्यक्ष म्हणून ॲड. तारानाथ वर्तक, सेक्रेटरी दिनकर वर्तक, उपाध्यक्षपदी नितीन वर्तक व विकास वर्तक, सहसेक्रेटरी महेंद्र नांगरे, खजिनदारपदी मनोज म्हात्रे तर सहखजिनदारपदी प्रमोद पाटील यांनी पदग्रहण केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डिस्टिक गव्हर्नर शशिकांत मोड यांनी शेतकरी हा ग्रामीण विकासाचा शिल्पकार असून पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जानेवारी महिन्यामध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्याचे प्रयोजन असून दात्यांनी शेतकऱ्यांना दत्तक घेऊन या उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले. विशेष निमंत्रित पास्ट डिस्टिक गव्हर्नर प्रशांत पाटील यांनी भविष्यात ग्रामीण भागातील शाळांसाठी मास्क, सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात गरज लागणार असून ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृतीची खरी गरज असल्याचे मत व्यक्त केले. वाईस डिस्टिक गव्हर्नर डॉ.ख्वाजा मुद्दतसर यांनी 210 देशांपेक्षा अधिक देशांमध्ये सुरू असलेल्या लायन्स क्लबमध्ये 13 लाख 60 हजार सभासद असून भारतात 2 लाख 80 हजार सभासद असल्याचे सांगून नवीन सभासदांना शपथ दिली. याप्रसंगी चंद्रशेखर घाग, हेमंत सेठीया आदी मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.तारानाथ वर्तक यांनी करसोंडे व सफाळे येथील आदिवासी पाड्यांमध्ये विजेची सुविधा उपलब्ध करून देणे, एडवण येथील मच्छी मार्केट मध्ये पाण्याची टाकी व सॅनिटायझर बसवणे, विविध उपक्रमांसाठी निधी उभा करणे आदी कामांसाठी प्राधान्य दिले जाणार असून लवकरच आपल्या परिसरातून कोरोनाला हाकलून लावू असा दृढ निश्चय व्यक्त केला.
क्लबचे माजी अध्यक्ष हरीश ठाकूर यांनी प्रास्ताविक केले तर माजी सेक्रेटरी नंदकुमार वर्तक यांनी आपल्या कारकिर्दीतील इतिवृत्त सादर केले. क्लबचे माजी खजिनदार जयवंत वर्तक यांनी जमाखर्चाचा आढावा घेतला. यावेळी विविध समित्यांचे प्रमुख आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरची सुद्धा घोषणा करण्यात आली. निधी संकलन प्रमुख म्हणून अशोक म्हात्रे, सर्विस चार्जपर्सन भालचंद्र चौधरी, मेंबरशिप चेअर पर्सन नंदकुमार वर्तक, मार्केटिंग कम्युनिकेशन चेअर पर्सन सतिष घरत, लायन्स क्लब समन्वयक दिलीप पाटील, टॅमर म्हणून सचिन वर्तक, टेल ट्विस्टर राजय चौधरी आदींची निवड करण्यात आली. तर बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून दामोदर पाटील, प्रवीण पाटील, महेंद्र किणी, कमळाकर चौधरी, जगदिश ठाकूर,
शरदकुमार शिंदे, अनंत वर्तक, नरेश पाटील, जयवंत वर्तक, हरेश्वर वर्तक, कमळाकर एस पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईशस्तवन व स्वागत गीत ऋत्वी पाटील व हार्दिका पटेल यांनी गाऊन उप8स्थितांची वाहवा मिळवली. ध्वज वंदन सहखजिनदार प्रमोद पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सेक्रेटरी दिनकर वर्तक यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभीच सफाळे लायन्स क्लबचे फाउंडर मेंबर्स अशोक चौधरी, विजय घासवाला
व ज्ञात-अज्ञात दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. या पदग्रहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास सराफ यांनी केले. यावेळी लायन्स क्लब चे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- लायन प्रमोद पाटील
सहखजिनदार
लायन्स क्लब ऑफ सफाळे
9049052555

Nice drafting Pramod patil sir
ReplyDeletePatil Sir, very nice write-up. Covered all points. Very well.
ReplyDeleteWell drafted and nice write up.
ReplyDelete