Skip to main content

.... अखेर जोई बनला सर्वांचाच लाडका

.... अखेर जोई बनला सर्वांचा लाडका

 पालघर (प्रमोद पाटील)

       पालघर मधील ताराबाग येथील मुक्ताई बंगलो येथे राहणाऱ्या पाटील कुटुंबियांच्या लाडक्या जोई या कुत्र्याचा आज सोमवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी पहिला वाढदिवस. त्यानिमित्त घेतलेला आढावा.              

        ताराबाग मध्ये राहत असलेल्या आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या श्रेयस पाटील याला पाळीव प्राण्यांची खूप आवड आहे. त्यांनी 17 नोव्हेंबर 2019 मध्ये जोई या गोल्डन रिट्रीवर जातीच्या कुत्र्याला आपल्या घरी आणले. त्यावेळी जोई अवघा 42 दिवसांचा होता. घरी आणल्यानंतर अवघ्या काही दिवसातच जोई हा पाटील कुटुंबियाचा एक महत्वाचा घटक बनला. लहान मुलांचा तर तो खूपच लाडका झाला. हळूहळू सर्व पाटील कुटुंबियांचा जोई वर लळा लागला.  

असा आला जोई मुक्ताई कुटुंबात ... 

        पालघर येथील ताराबाग भागात मुक्ताई कुटुंब राहत आहे. श्रेयसचे वडील आणि आई दोघेही शिक्षक आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच 19 ते 26 नोव्हेंबर 2019 या कालावधीसाठी या दोघांनाही इंडोनेशिया देशातील बाली येथील शैक्षणिक परिषदेला उपस्थित राहायचे होते. या परिषदेला राज्यातील फक्त उपक्रमशील शिक्षक जाणार होते. शैक्षणिक परिषद असल्याने इंडोनेशिया येथे मुलांना घेऊन जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मुलांनी एक शक्कल लढवली. आम्ही परिषदेला येणार नाही मात्र आम्हाला एक गोष्ट द्यायची आहे आणि ती म्हणजे घरामध्ये एका कुत्र्याला आणण्याची परवानगी. नाईलाजाने मुलांना परवानगी देण्यात आली. अशा रीतीने जोई चे 17 नोव्हेंबर 2019 रोजी अनपेक्षितपणे मुक्ताई कुटुंबात आगमन झाले. 

 मुलांचीच जबाबदारी... 

  मोठ्यांची इच्छा नसतानासुद्धा अगदीच एक दीड महिन्याच्या लहान जोई ला (कुत्र्याच्या पिल्ल्याला) घरी आणल्यापासून श्रेयस त्याची बहीण ऋत्वि आणि चुलत बहिणी आर्या आणि आभा या चौघांनी जोई ला खायला देण्यापासून त्याची आंघोळ करणे, त्याला कपडे घालणे, वेळच्या वेळी डोस देणे, त्याला वॉकला घेऊन जाणे, त्याच्याबरोबर खेळणे आदी जबाबदारी घेऊन त्याची काळजी घेत आहेत. आज जोई हा पाटील कुटुंबियांचा एक सदस्यच बनला आहे. 

 खाऊच्या पैशातून जोईचा खर्च... 

     या चारही मुलांनी आपले खाऊचे पैसे वाचवून जोई ला लागत असलेल्या गोष्टी जसे त्याचे खाणे, त्याला झोपायला लागणारी गादी, त्याला वॉकला घेऊन जाणे,  त्याला वेगवेगळ्या डोससाठी होणारा खर्च आदी खर्च त्यांनी साठवून ठेवलेले पिगी बँकेतून करत आहेत. 

 लॉकडाऊन चा जोईला फायदाच ... 

  covid-19 मुळे गेल्या मार्च महिन्यापासून आजतागायत शाळा- महाविद्यालये बंद असल्याने मुलं घरूनच ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. त्यामुळे जोईला वेळच्यावेळी खाण देणं किंवा त्याची काळजी घेणे मुलांना सोपे झाले आहे. कोविडमुळे बऱ्याच घटकांना जरी फटका बसला असला तरी जोईला मात्र त्याचा फायदाच  झाला आहे. 


Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...