प्रमोद पाटील
पालघर
गेल्या मार्च महिन्यापासून आपल्या अवतीभवती भीतीचे आणि चिंतेचे वातावरण असतानाच सर्वांच्या मदतीला धावणाऱ्यालाच कोरोनाची लागण झालेल्या डहाणू आगार येथील संदेश पाटील या तरुणाने या परिस्थितीवरही मात करून एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.
श्रद्धा इंटरप्राईजेसचे मालक तथा डहाणू आगर येथील सामाजिक कार्यकर्ते संदेश पाटील यांची गेल्या 11 जुलै रोजी वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना
कोरोनाची लागण झाली होती. वैद्यकीय अहवालात ते पॉझिटिव असल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे गेल्या दहा दिवसापासून ते बोईसर येथील टिमा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या अखेर त्यांनी कोरोनावर मात केल्याने सोमवारी (ता. 20 ) त्यांना घरी सोडण्यात आले.
संदेश पाटील हे आपले जुळे भाऊ संजय पाटील यांच्यासोबत गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या मदतीला धावत होते. या काळात त्यांनी स्थलांतरित मजुरांना स्वखर्चाने घरी पोचवण्यासाठी पुढाकार घेतला. डहाणू बरोबरच चारोटी नाका येथून सुमारे तीनशे ते साडेतीनशे मजुरांना त्यांच्या गावी पोचण्यासाठी मदत केली. गुजरात राज्यातून आपल्या राज्यात आलेल्या सुमारे 12 ते 13 शे खलाशांना पाणी व इतर अत्यावश्यक सुविधा निर्माण करून देण्यासाठी या दोघाही भावांनी खूप मेहनत घेतली. याच कालावधीमध्ये समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळापासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेऊन आगर येथील सुमारे दीडशे लोकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या भोजनाची व निवाऱ्याची सोय केली. सामान्य आणि अत्यंत गरीब लोकांना शासनाच्या शिवभोजन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी डहाणू रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच शिवभोजन कक्ष सुरू करून दररोज सुमारे 400 लोकांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून डहाणू नगरपालिका क्षेत्रामध्ये निर्जंतुक फवारणी करणे, वृक्षारोपण करणे, रेल्वे प्रवाशांना योग्य ती मदत करणे आदी कामात त्यांनी हिरीरने पुढाकार घेतला होता. लायन्स क्लबच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबिरात संदेश पाटील यांनी स्वतः रक्तदान करून तरुणांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या या लढाईत त्यांना सावटा येथील के.के. मिस्त्री हायस्कूलचे ट्रस्टी रमेश नहार, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक शैलेश राऊत यांचे त्यांना अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले.
भाऊ असावा तर असा...
कोरोनाची लागण झाल्यानंतर बहुदा कुटुंबातील सदस्य त्या व्यक्तीच्या संपर्कात येत नाहीत. अनेकजण तर अशा रुग्णाचे तोंड सुद्धा बघत नाहीत. असे आपण गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर पाहतो, ऐकतो. मात्र या गोष्टीला तिलांजली देत या दोन भावांनी सकारात्मकतेचा चांगला संदेश दिला आहे. गेले दहा दिवस संदेश पाटील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्यांचे जुळे भाऊ संजय पाटील हे दररोज घरून त्याच्यासाठी जेवण घेऊन येत असत. तसेच भावाला भावनिक आधार मिळावा म्हणून हॉस्पिटलच्या अवतीभवती दिवसभर थांबत असत. त्यामुळे भाऊ असावा तर असा असावा अशा भावना समाजात उमटत आहेत.
-प्रमोद पाटील
पालघर
9049052555
Good one 👌👌👌
ReplyDeleteGreat and Motivating Work.
ReplyDeleteDo Dil ek Jaan
ReplyDeleteKeep it up my friends