केवल शालेय शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजे गुरु आणि शिष्य असे नव्हे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मार्गदर्शन करणारा गुरू असतो. तर दुसऱ्याचे विचार जीवनात अंगीकारणारा हा शिष्य असतो. थोडक्यात, गुरुची परंपरा सुरू राहण्यासाठी आवश्यक असतो तो शिष्य. हा शिष्य ही परंपरा फक्त पुढे नेत नाही तर ती अधिकाधिक समृद्ध करत जातो. याचीच असंख्य उदाहरणं आपल्याला जगभर दिसतील. गुरू- शिष्याच्या अशाच काही जोड्या जर आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी एका विशिष्ट क्षेत्रात महान असं कार्य केलंय. त्या विषयाला एक आगळं वेगळं वलय या गुरुशिष्यामुळे प्राप्त झाल्याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्यापैकी द्रोणाचार्य- अर्जुन, सांदिपनी ऋषी- श्रीकृष्ण, चाणक्य- चंद्रगुप्त, समर्थ रामदास - शिवाजी महाराज, अरस्तु- सिकंदर, स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस अशा गुरु-शिष्यांच्या जोड्या खूपच प्रसिद्ध आहेत..
मार्च महिन्यापासून आपल्या देशामध्ये कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव वाढत असून देशातील शाळा देशातील शाळा, महाविद्यालये, विविध शैक्षणिक संस्था बंद आहेत. शाळा, महाविद्यालये, विविध शिक्षण संस्था जरी बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवावे अशा प्रकारचे शासनाचे निर्देश आहेत. शिक्षण ही प्रक्रिया एकाकी नसून एकमेकांना समजावून घेऊन आपल्या विचारांचे आदान-प्रदान करणे हे आवश्यक आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना ज्ञान मिळत असेल पण त्यांच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या इतर गोष्टी मिळू शकत नाही. किंबहुना काही तज्ञांच्या मते, ऑनलाईन शिक्षण पद्धतीने गुरू-शिष्याच्या संबंधांमध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
Guru-Shishya Khup Chhan Bonding..
ReplyDelete