Skip to main content

सफाळयातील बनावट नोटा बनवणारयांवर कारवाई, चौघांना अटक

सफाळयातील बनावट नोटा बनवणारयांवर कारवाई, चौघांना अटक

प्रमोद पाटील
केळवे वार्ताहर ता.9

 सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या सोनावे येथील धोदडीपाड्यात भारतीय चलनातील बनावट चलनी नोटा बनवणारया चौघांना पोलिसांनी शुक्रवारी ( ता. 8) मुद्दे मालासह अटक केली आहे.

    सोनावे येथील धोदडीपाड्यातील नथुराम सिन्या दुमाडा( वय 48) याच्या घरी पर प्रांतीय बालराज बालाप्पा गुडसे( वय 44),अब्राहम सतीराजू चित्तांपल्ली( वय 37), राजगोपाळराव विरराजू सुरमपुडी ( वय 44) हे चौघे एकमेकांच्या संगनमताने नथुरामच्या घरी भारतीय चलनातील बनावट नोटा बनवून त्या चलनात वापर करत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्या खबरी नुसार पोलिसांनी शुक्रवारी (ता.8 ) सकाळी 6 वाजून दहा मिनिटांनी धाड टाकली असता त्या ठिकाणी बनावट दोन हजार रूपयांच्या नोटा बनवण्यासाठी लागणारे केमिकल साधन सामुग्री तसेच दस्तऐवज यांचा वापर करून भारतीय चलनात बनावट चलनी नोटा व त्या तयार करण्यासाठी वापरत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य सापडले. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 12,030 रूपयांचा किंमती माल जप्त केला.  

  सदर प्रकरणी सफाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींना सफाळे येथील पोलिस ठाण्यात अटक करण्यात आली आहे. 

  सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी  व त्यांच्या सहकार्यांनी केली. 

  दरम्यान, बनावट चलनी नोटांचे अजून काही धागेदोरे हाती येतात का? या बाबतीत पोलिस प्रयत्न करत आहेत.  

Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...