Skip to main content

सफाळयात इंटर नॅशनल लायन्स क्लब च्या माध्यमातून सॅटेलाइट सर्व्हीस वीकचे उदघाटन



प्रमोद पाटील
केळवे वार्ताहर ता.6

   बहुसंख्य समाज आजही दारिद्र्य आणि बेकारीने गांजलेला आहे. अशा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संघटना नेहमीच प्रयत्नशील असतात.याचे भान ठेवून लायन्स क्लब च्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत असे लायन्स क्लबचे  डिस्ट्रीक गव्हर्नर डाॅ दिपक चौधरी यांनी सांगितले.

                इंटरनॅशनल लायन्स क्लब तर्फे सॅटेलाईट सर्व्हीस वीकचे उदघाटन रविवारी (ता. 6) सफाळे येथील राजगुरु ह म विद्यालयात करण्यात आले. या वेळी बोलताना डाॅ.चौधरी यांनी समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने लायन्स क्लब च्या माध्यमातून  विविध उपक्रम हाती घेत आहोत. विशेषतः खेडयातील विद्यार्थी दळण वळणांच्या सोयी सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी खुपच त्रास होत असल्याने गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना 120 सायकली वाटप करण्यात आल्या आहेत असे सांगितले.

              या वेळी मुंबई आणि मुंबई उपनगरातील वरळी, सांताक्रूझ, गोरेगाव पासून सफाळे, पालघर, बोर्डी पर्यंत सुमारे 75 लायन्स क्लब चे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते.  

   या वेळी गरजूंना चादर, ब्लॅन्केट, चटई, कापडी बॅगा, तेल, डाळ, कडधान्ये, पिठ, सायकली आदी वस्तू वाटप करण्यात आले.तसेच या वेळी मोफत नेत्रचिकित्सा, मधूमेह तपासणी करण्यात आली. सुमारे नव्वद लाख रुपयांच्या विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

               सफाळे लायन्स क्लब चे अध्यक्ष दामोदर पाटील यांच्या विशेष प्रयत्नांने झालेल्या या कार्यक्रमात लायन्स क्लब चे एम जे एफ हिरालाल शर्मा, बिपीन सोलंकी, फस्ट व्हाईस डिस्टीक गव्हर्नर अजित जैन, सेकंड व्हाईस डिस्टीक गव्हर्नर

शशिकांत मोदी,डिस्ट्रिक कॅबिनेट सचिव मनोज बापट, स्मिता चौधरी व 75 क्लब चे अध्यक्ष आणि पदाधिकारी तसेच ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव अॅड दीपक भाते, खजिनदार कांती दोशी , सफाळे क्लब चे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

       कार्यक्रमाच्या सुरूवातीला लेझिम पथकाचे विविध प्रकारचे प्रात्यक्षिके तर त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी मोखाडा येथील पारंपरिक आदीवासी नृत्यांनी विशेष दाद मिळवली.

छाया- प्रमोद पाटील 

Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...